maratha arkshan 
देश

मराठा आरक्षण : सुनावणीचं वेळापत्रक ठरलं; 8 ते 18 मार्च दरम्यान होणार सुनावणी

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : मराठा आरक्षणावर आज सुनावणी झाली. या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलं होतं. या सुनावणीमध्ये प्रत्यक्ष सुनावणीबाबतचा निर्णय होणार होता. आणि आता पुढील सुनावणी 8 मार्चपासून सुरु होणार आहे, असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. न्यायालयाने सुनावणीबाबतचं वेळापत्रक ठरवून दिलं आहे. 

8, 9 आणि 10 मार्चला आरक्षणाचे विरोधक म्हणजेच याचिकाकर्त्यांची ऐकून घेतली जाईल. तर 12, 15, 16 आणि 17 तारखेला आरक्षणाचे समर्थक म्हणजेच राज्य सरकारची बाजू मांडली जाईल. तर 18 मार्चला केंद्र सरकारचं म्हणणं ऐकलं जाईल. थोडक्यात, मराठा आरक्षणावरील सुनावणी 8 मार्चला सुरु होऊन 18 मार्चला ती संपेल. या 10 दिवसांच्या कालावधीत विभागवार 3 दिवस याचिकाकर्ते तर 4 दिवसांचा वेळ राज्य सरकारला दिला आहे. ही 18 मार्चला सुनावणी पूर्ण होईल. आणि निकाल राखून ठेवला जाऊ शकतो. सुप्रीम कोर्टाने याबाबतच वेळापत्रक निश्चित केलं आहे. केंद्र सरकारचे वकील देखील यात बाजू मांडणार आहेत. 

प्रत्यक्ष सुनावणी की ऑनलाईन?

प्रत्यक्ष सुनावणी किंवा व्हिडीओ कॉन्फरंन्सिंग जी त्या दिवशीची परिस्थिती असेल, त्यानुसार, सुनावणी केली जाईल. म्हणजे सुनावणीतील सगळेच दिवस प्रत्यक्षात सुनावणी होईलच, असं सांगता येत नाही. मात्र ही सुनावणी नियमित होईल, अशी आशा आहे. 

आज साधारण 10.30 वाजता या सुनावणीस सुरवात झाली. मराठा आरक्षणावर आणलेली अंतरिम स्थगिती उठवली जाईल का, याकडे राज्याचं लक्ष लागून राहिलं होतं. मराठा आरक्षणाची सुनावणी ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून घेऊ नये असं सरकारचं म्हणणं आहे, मात्र आजची सुनावणी देखील व्हिडीओ कॉन्फरंन्सिंगच्या माध्यमातूनच झाली.  न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखाली न्यायमूर्ती नागेश्‍वर राव, न्यायमूर्ती हेमंत गुप्ता, न्यायमूर्ती रवींद्र भट तसंच न्यायमूर्ती अब्दुल नजीर यांचा समावेश असलेले घटनापीठापुढे ही सुनावणी होणार आहे.

मराठा आरक्षणावरील मागची सुनावणी 20 जानेवारी रोजी झाली होती. या सुनावणीमध्ये सर्व पक्षकारांच्या वकिलांनी 'सुनावणी ऑनलाईन न होता ती प्रत्यक्षात व्हावी', अशी मागणी केली होती. यानुसार, सुप्रीम कोर्टाने याबाबतचा निर्णय दोन आठवड्यांनंतर दिले जातील, असे स्पष्ट केले होते. त्यामुळे पुढील सुनावणी आज 5 फेब्रुवारीला झाली आहे. इतर काही युक्तीवाद मागच्या सुनावणीत करण्यात आले नव्हते. त्यामुळे, सुप्रीम कोर्टाने मागची सुनावणी स्थगित केली होती. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: हॅरी ब्रूकने 'खांद्या'ने वाचवली स्वतःची विकेट! लढवली अक्कल, पण झाला असता त्याचाच गेम; रिषभ पंत भडकला

Ashadhi Wari 2025: वारकऱ्यांसोबत श्वानाची पंढरपूर वारी! महिनाभरात पालख्यांबरोबर चालत पोचतोय विठ्ठलचरणी

"उपाध्येंना अटेंशनची सवय.." निलेश साबळे-शरद उपाध्ये वादावर मराठी कलाकार व्यक्त ; म्हणाले...

PCMC News : आणखी तेरा ठिकाणी स्वस्त धान्य दुकाने; पुणे, पिंपरी-चिंचवड क्षेत्रांतील नागरिकांना ३१ जुलैपर्यंत करता येणार अर्ज

Hinjewadi News : हिंजवडी फेज २ ते लक्ष्मी चौक रस्ता होणार खुला; रस्त्यातील अतिक्रमणांवर ‘पीएमआरडीए’कडून कारवाई

SCROLL FOR NEXT