maratha reservation esakal
देश

Maratha Reservation : मराठ्यांचा ओबीसीत समावेश केला जावा; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाकडे याचिका

मराठा समाजाचा समावेश ओबीसी प्रवर्गात करावा, अशी मागणी करणारी याचिका ॲड. राजसाहेब पाटील यांनी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्याकडे दाखल केली आहे.

सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

नवी दिल्ली - मराठा समाजाचा समावेश ओबीसी प्रवर्गात करावा, अशी मागणी करणारी याचिका ॲड. राजसाहेब पाटील यांनी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्याकडे दाखल केली आहे. दरम्यान याचिकेच्या अनुषंगाने आयोगाने केस क्रमांक दिला असून त्यावर लवकर सुनावणी होणे अपेक्षित आहे, असे पाटील यांनी ''सकाळ'' शी बोलताना सांगितले.

मराठा समाजाचा समावेश ओबीसी प्रवर्गात करतानाच मागील ५५ वर्षांचा अनुशेष भरून काढला जावा, अशी मागणी करण्यात आली असल्याचे सांगून पाटील म्हणाले की, ‘शिक्षण आणि नोकऱ्यांत आरक्षण नसल्याने मराठा समाज दिवसेंदिवस मागे पडत चालला आहे. या पार्श्वभूमीवर या समाजाला आरक्षण देणे काळाची गरज बनली आहे. शिवाय आरक्षणाच्या केंद्रीय यादीत या समाजाला सहभागी करून घ्यावे.’

मागील दीड-दोन महिन्यांत कुणबीची जी प्रमाणपत्रे मिळाली आहेत, त्या आधारे आरक्षणाअंतर्गत पदे भरली जावीत, मराठा समाजाचे वर्गीकरण निश्चित करण्यासाठी सर्व जिल्ह्यांतील सर्व कागदपत्रे जमा करण्याचे निर्देश न्या. शिंदे समितीला दिले जावेत, अशा मागण्या आयोगाकडे करण्यात आल्या असल्याचे पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

Pune Metro: पुणेकरांना मोठा दिलासा! विमानतळाला मेट्रोची थेट जोडणी, कर्वे रस्त्यावर दुमजली उड्डाणपूल; मोहोळ यांच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बुलढाणा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाच्या मागणीसाठी आमरण उपोषण; शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आंदोलन

Mumbai News: फेरीवाला परवान्यांवर न्यायालयाचे ताशेरे, एकाच कुटुंबाला अनेक परवाने; पालिकेला फटकारले

SCROLL FOR NEXT