File photo of Arvind Kejriwal
File photo of Arvind Kejriwal 
देश

दिल्लीच्या मुख्य सचिवांना 'आप'च्या आमदारांची मारहाण 

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : दिल्ली सरकारचे मुख्य सचिव अंशू प्रकाश यांना सत्ताधारी 'आम आदमी पार्टी'च्या (आप) आमदारांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासमोरच मारहाण केली. 'आप'ने हे आरोप फेटाळताना 'प्रकाश हे भाजपचे एजंट म्हणून काम करत आहेत' अशी भूमिका घेतली आहे. 

या मारहाणीनंतर दिल्लीतील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या संघटनेने बैठक आयोजित केली आहे. यामध्ये या घटनेसंदर्भातील भूमिका स्पष्ट केली जाणार आहे. 'आप'च्या आमदारांविरोधात ही संघटना पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याच्या तयारीत आहे. 

दरम्यान, 'आप'ने ही संपूर्ण घटनाच बनावट असल्याचा दावा केला आहे. ''आधार'च्या चुकीच्या अंमलबजावणीमुळे जवळपास अडीच लाख कुटुंबांना रेशनच्या सुविधेपासून वंचित राहावे लागले. या प्रकरणी जनतेकडून आमदारांवर प्रचंड दडपण आले होते. या संदर्भात मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या निवासस्थानी आमदारांची बैठक झाली. यामध्ये मुख्य सचिव प्रकाशही उपस्थित होते. पण 'मी मुख्यमंत्री किंवा आमदारांना उत्तर देण्यास बांधील नाही; मी फक्त नायब राज्यपालांना उत्तर देण्यास बांधील आहे' असे उत्तर प्रकाश यांनी दिले. प्रकाश यांनी काही आमदारांना शिवीगाळही केली आणि कोणत्याही प्रश्‍नाचे उत्तर न देता ते निघून गेले', असा दावा 'आप'ने केला आहे. ही बैठक काल (सोमवार) सायंकाळी झाली होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; पंजाबची गळती सुरू जवळपास निम्मा संघ गारद

Baramati Lok Sabha Election : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT