देश

गुप्तांच्या उमेदवारीस काँग्रेसचा आक्षेप 

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे राज्यसभेसाठीचे उमेदवार नारायणदास गुप्ता यांच्याकडे लाभाचे पद असल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज फेटाळण्यात यावा, अशी आग्रही मागणी दिल्ली काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली आहे.

गुप्ता यांच्या उमेदवारी अर्जाच्या पडताळणीवरच काँग्रेसने आक्षेप घेतला असून, अजय माकन यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या एका प्रतिनिधी मंडळाने आज दिल्लीत निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली.

गुप्ता हे राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेचे विश्‍वस्त (एनपीएस) असून, राज्यघटनेनुसार हे पद लाभाचे आहे, असा दावा माकन यांनी केला. लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम 36 अन्वये गुप्ता यांचा उमेदवारी अर्ज फेटाळण्यात यावा असे त्यांनी म्हटले आहे. गुप्ता यांची 30 मार्च 2015 रोजी "एनपीएस'च्या विश्‍वस्तपदी नियुक्ती करण्यात आली होती. ते अद्याप देखील त्याच पदावर कायम असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. 

भाजप कनेक्‍शनवर टीका 
गुप्ता यांच्या भाजप कनेक्‍शनवरही माकन यांनी टीका केली आहे. गुप्ता हे भाजपचे छुपे समर्थक असून, ते अर्थमंत्री अरुण जेटली यांचे निकटवर्तीय असल्यानेच त्यांना उमेदवारी देण्यात आली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तत्पूर्वी आम आदमी पक्षातील असंतुष्ट नेते कुमार विश्‍वास यांनीदेखील गुप्ता यांच्या उमेदवारीवरून थेट मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ujjwal Nikam: उज्ज्वल निकम यांना भाजपकडून मुंबई उत्तर-मध्यमधून उमेदवारी जाहीर; पुनम महाजन यांचा पत्ता कट

Shashikant Shinde: मार्केट FSI घोटाळा प्रकरणी शशिकांत शिंदेंवर गुन्हा दाखल; निवडणुकीच्या तोंडावर कारवाईची शक्यता

Latest Marathi News Live Update: पुण्याचे माजी महापौर मोहनसिंग राजपाल यांचे दीर्घ आजाराने निधन

Hemant Soren : हेमंत सोरेन यांना धक्का! ईडी कोर्टाने फेटाळला जामीन अर्ज; काय आहे प्रकरण?

Lok Sabha Election : ....म्हणून श्रीकांत शिंदेंना लोकसभेत पाठवणे गरजेचे; रामदास आठवलेंचे उल्हासनगरात आवाहन

SCROLL FOR NEXT