marathi news gujarat election 2017 Rahul Gandhi news
marathi news gujarat election 2017 Rahul Gandhi news 
देश

गुजरातमध्ये आयोगाने फटकारताच 'पप्पू'चा बनला 'युवराज' !

महेश शहा

अहमदाबाद : प्रचारासाठीच्या जाहिरातींमध्ये काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना उद्देशून "पप्पू' हा शब्द वापरण्यास गुजरातमध्ये निवडणूक आयोगाने भाजपला मनाई केल्यानंतर भाजपने 'युवराज' हा शब्द वापरायला तत्काळ सुरूवात केली. 

राहुल यांना लक्ष्य करण्याच्या उद्देशाने सोशल मीडियावर भारतीय जनता पक्षाच्या समर्थकांकडून "पप्पू' हा शब्द मोठ्या प्रमाणात वापरला जात आहे. जाहिरातीच्या मजकुरातील कोणताही शब्द एखाद्या व्यक्तीला उद्देशून वापरलेला नसल्याचा दावा भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. 

भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपच्या वतीने मागील महिन्यात जाहिरातीची संहिता मान्यतेसाठी निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आली होती. त्यामधील "पप्पू' हा शब्द मानहानीकारक असल्याचे सांगत राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नेतृत्वाखालील प्रसारमाध्यम समितीने याला आक्षेप घेतला होता. आयोगाने मनाई करताच भाजपने राहुल यांच्यासाठी "युवराज' हा शब्द उपरोधिक अर्थाने वापरायला सुरवात केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जीव दे म्हटलं म्हणून एखाद्याने खरंच जीवन संपवलं तर काय? हायकोर्टाची महत्त्वाची टिप्पणी

Instagram Algorithm : इन्स्टाग्रामच्या नियमांमध्ये मोठा बदल; ओरिजिनल कंटेंट होणार प्रमोट.. मात्र यूजर्सचं टेन्शन वाढणार!

Namrata Sambherao: "महाराष्ट्राची लाडकी नमा..."; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरनं नम्रता संभेरावला लिहिलं खास पत्र

Viral Video: खिशात खेळण्यातली पिस्तूल सापडल्यानंतर पकडले कान, मुंबई मेट्रो स्टेशन वरील चिमुकल्याचा व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : कल्याणमधून श्रीकांत शिंदे अर्ज भरणार, जोरदार शक्तीप्रदर्शनाची तयारी

SCROLL FOR NEXT