देश

नायब राज्यपाल हेच दिल्लीचे प्रमुख : सर्वोच्च न्यायालय

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : दिल्ली सरकारने घेतलेल्या निर्णयांना नायब राज्यपालांची मान्यता असणे आवश्‍यक आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने आज स्पष्ट केले. मात्र, नायब राज्यपालांनीही आपल्या अधिकारांचा वापर करत योग्य वेळी निर्णय आणि या निर्णयामागील कारण देणे आवश्‍यक आहे, असेही न्यायालयाने सांगितले. 

नायब राज्यपाल हे राजधानी दिल्लीचे प्रमुख असण्याबाबत दिल्ली सरकारने केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. दिल्ली उच्च न्यायालयाने नायब राज्यपाल हेच प्रशासकीय प्रमुख असतील, असा निर्णय दिला होता. त्याविरोधात दिल्ली सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने उच्च न्यायालयाचा हा निर्णय मान्य करत नायब राज्यपाल हेच दिल्ली, दिल्ली पोलिस आणि कायदा सुव्यवस्थेचे प्रमुख असतील, असे स्पष्ट केले. मात्र, लोकशाहीमार्गाने निवडून आलेल्या दिल्ली सरकारचे निर्णय नायब राज्यपाल आपले अधिकार वापरून अडवून ठेवू शकत नाहीत, असेही न्यायालयाने सांगितले.

दिल्ली सरकारला अत्यंत कमी अधिकार असून या अधिकारात वाढ केली जावी, अशी मागणी दिल्ली सरकारच्या वतीने ज्येष्ठ वकील गोपाल सुब्रमण्यम यांनी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: धक्कादायक! पुण्यात हॉस्पिटलसमोर सापडला जिवंत बॉम्ब; क्षणार्धात परिसर सील, सात तासांचा टाइमर सेट

Shirur News : थंडावा शोधताना काळाचा घाला; कवठे येथे मुलांसोबत पोहायला गेलेल्या वडिलांचा बुडून मृत्यू

Waste Management Project : कचरा प्रकल्पातून आर्थिक नुकसान टाळा; विरोधीपक्ष नेत्यंची आयुक्तांकडे मागणी

Bridge Collapse : आमणोली येथील प्रवासी पूल कोसळला; सुदैवाने मोठी जीवितहानी टळली, दोषींवर कारवाईची मागणी

Donald Trump: चीनमध्ये उतरताच डोनाल्ड ट्रम्प यांचा अपमान! स्वागतासाठी शी जिनपिंग गैरहजर; ड्रॅगनकडून अमेरिका-चीन संबंधांबाबत नवा संकेत?

SCROLL FOR NEXT