Rahul Gandhi and Priyanka Gandhi
Rahul Gandhi and Priyanka Gandhi 
देश

राहुल अध्यक्षपदी; आता प्रियांका गांधी राजकारणात येणार? 

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे राहुल गांधी यांनी अधिकृतरित्या हाती घेतल्यानंतर आता प्रियांका गांधी यांच्या राजकारण प्रवेशाची चर्चा जोरात सुरु झाली आहे. किंबहुना, आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये प्रियांका गांधी अमेठी किंवा रायबरेली या गांधी घराण्याच्या हुकमी मतदारसंघातून रिंगणात उतरतील, अशी शक्‍यता राजकीय विश्‍लेषक वर्तवत आहेत. 

राहुल गांधी यांच्याकडे पक्षाची सर्व सूत्रे सोपविल्यानंतर सोनिया गांधी यांनी राजकारणातून निवृत्तीचे सूतोवाच केले होते. या संकेताचा अर्थ लावत 'त्या लोकसभा निवडणूक लढविणार की नाही' यावर कालपासून चर्चा सुरू झाली आहे. सोनिया गांधी रायबरेलीतून निवडून येत आहेत, तर अमेठी हा राहुल गांधी यांचा मतदारसंघ आहे. सोनिया गांधी यांच्या निवृत्तीच्या वक्तव्यानंतर रायबरेलीतून प्रियांका गांधी निवडणूक लढविणार असल्याचे संकेत मिळत आहेत. 

या सर्व चर्चांच्या पार्श्‍वभूमीवर 'रायबरेलीतून 2019 ची निवडणूक सोनिया गांधीच लढवतील' असे स्पष्टीकरण खुद्द प्रियांका गांधी यांनी दिले आहे. 'एनडीटीव्ही'शी बोलताना प्रियांका यांनी हा खुलासा केला. 'रायबरेलीतून मी निवडणूक लढविण्याचा प्रश्‍नच येत नाही. माझी आईच तिथून निवडणूक लढवेल' असे त्यांनी या वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. 

राहुल गांधी यांनी आज (शनिवार) एका सोहळ्यामध्ये पक्षाची सूत्रे हाती घेतली. या कार्यक्रमामध्ये प्रियांका गांधी यांच्या संभाव्य राजकारण प्रवेशाबाबत काही संकेत मिळतील, अशी राजकीय विश्‍लेषकांना अपेक्षा होती. मात्र या कार्यक्रमात प्रियांका गांधी आणि त्यांचे पती रॉबर्ट वद्रा यांनी व्यासपीठावर न बसता उत्तर प्रदेशमधील काँग्रेसच्या इतर नेत्यांबरोबर बसणे पसंत केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: शेअर बाजार किरकोळ वाढीसह बंद; पॉवर शेअर्स बनले 'सुपरस्टार'

IPL 2024: केकेआरचा स्टार खेळाडू आता बॉलिवूडमध्ये करणार एन्ट्री; स्मृती मानधनाच्या बॉयफ्रेंडनं दिली संधी

Crime News : बुलढाणा जिल्ह्यात एकाच दिवशी 22 डीजे वर कारवाई; 6 लाख 32 हजार दंड, व गुन्हे दाखल

Latest Marathi News Live Update : “लव्ह जिहाद, भू जिहादनंतर आता व्होट जिहाद”, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर टीका

Rahul Gandhi: निवडणुकीत पाकिस्तानची एन्ट्री! 'राजकुमाराला पंतप्रधान बनवण्यास पाकिस्तान आतुर', मोदींचा राहुल यांच्यावर निशाणा

SCROLL FOR NEXT