representational image of Indian Railway 
देश

रेल्वेतील 'बायो-टॉयलेट' तुंबली 

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : रेल्वेत सुरू करण्यात आलेल्या बायो-टॉयलेटमुळे प्रवाशांच्या अडचणी सुटण्याऐवजी आणखी वाढत असल्याचे दिसून आले आहे. महालेखापालांनी (कॅग) संसदेत सादर केलेल्या अहवालानुसार, बायो-टॉयलेटबद्दल सुमारे दोन लाख तक्रारी आल्या आहेत. यामध्ये ती तुंबणे, दुर्गंधी येणे आणि बंद असणे या तक्रारींचा प्रामुख्याने समावेश आहे. 

महालेखापालांनी तपासणी केलेल्या 32 डेपोंमधील 613 रेल्वे गाड्यांपैकी 453 गाड्यांमध्ये 25 हजार 80 बायो-टॉयलेट बसविण्यात आली आहेत. उरलेल्या 160 गाड्यांमध्ये बायो-टॉयलेट नाहीत. बायो-टॉयलेटबद्दल प्रवाशांच्या 1 लाख 99 हजार 689 तक्रारी आल्या आहेत. यातील सर्वाधिक 1 लाख 2 हजार 792 तक्रारी बायो-टॉयलेट तुंबण्याविषयी आहेत. दुर्गंधीबाबत 16 हजार 375, बंद असण्याबाबत 11 हजार 462, डस्टबिन उपलब्ध नसणे 21 हजार 181, मग उपलब्ध नसणे 22 हजार 899 अशा तक्रारी प्रवाशांनी केल्या आहेत. 

बायो-टॉयलेट तुंबण्याच्या तक्रारी 2016-17 मध्ये 1 लाख 2 हजार 792 आल्या आहेत. एकूण बायो-टॉयलेट 25 हजार 80 आहेत. म्हणजेच वर्षभरात एक बायो-टॉयलेट सरासरी चार वेळा तुंबले. त्याआधी 2015-16 मध्ये 24 हजार 675 बायो-टॉयलेट होती आणि तुंबण्याच्या तक्रारी 61 हजार 88 होत्या. यातून स्पष्ट होते, की बायो-टॉयलेट तुंबण्याच्या घटना वाढल्या आहेत. यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज महालेखापालांनी अहवालात मांडली आहे. 

रेल्वेचे प्रवाशांवर खापर 
बायो-टॉयलेट तुंबण्याच्या घटनांमध्ये वाढ होण्याचा संबंध रेल्वे मंत्रालयाने प्रवाशांकडून होत असलेल्या चुकीच्या वापराशी जोडला आहे. मंत्रालयाने म्हटले आहे, की बायो-टॉयलेट तुंबण्याबद्दल ठोस उपाय योजण्यात येतील. मात्र, प्रवाशांकडून चुकीच्या पद्धतीने वापर सुरू असल्याने ती तुंबत आहे. बायो-टॉयलेटमधील डस्टबिन स्टीलच्या असल्यामुळे चोरीला जात आहेत. 

लवकरच 'बायो-व्हॅक्‍यूम टॉयलेट' 
सध्याच्या बायो-टॉयलेटऐवजी बायो-व्हॅक्‍यूम टॉयलेट बसविण्याचा विचार रेल्वे मंत्रालयाकडून सुरू आहे. ही बायो-व्हॅक्‍यूम टॉयलेट वासविरहित, पाण्याची बचत करणारी आणि तुंबण्याची अतिशय कमी शक्‍यता असणारी आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi: इंग्लंडमधील अपयशानंतर १५ वर्षांचा वैभव 'बॅक टू वर्क; दौऱ्यावरून परताच घरी राहण्याऐवजी कुठे गेलाय पाहा Video

विद्यापीठाचा ३० जुलैला पदवीदान समारंभ! पद्मभूषण जे. बी. जोशींना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ तर पद्मश्री प्रभूणेंना ‘डी.लिट.’; राज्यपालांच्या हस्ते होणार सन्मान, वाचा...

England vs Argentina: ७ मिनिटांत मॅच फिरवली! अर्जेंटिनाची फायनलमध्ये धडक; इंग्लंडचे ६० वर्षांनंतर वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न भंगले

भारतावर शंभर टक्के आयात शुल्क लावण्याचं अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक; रशियाच्या तेल खरेदीवरुन पाच देशांवर संकट?

Kannad Water Supply Scheme : कन्नड शहरासाठी ५६ कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर! ​आमदार संजना जाधव यांच्या पाठपुराव्याला यश

SCROLL FOR NEXT