Anant Kumar Hegde Siddharamaiah
Anant Kumar Hegde Siddharamaiah 
देश

टिपू सुलतानच्या जयंतीला मला बोलवू नका.. : भाजपचे खासदार 

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : 'टिपू सुलतानच्या जयंतीनिमित्त होणाऱ्या कोणत्याही कार्यक्रमास मी उपस्थित राहणार नाही' असे केंद्रीय कौशल्य विकास राज्यमंत्री अनंतकुमार हेगडे यांनी स्पष्ट केले आहे. यानिमित्ताने कर्नाटकमध्ये होणाऱ्या टिपू सुलतानच्या जयंतीच्या कोणत्याही कार्यक्रमाच्या पत्रिकेत माझ्या नावाचा समावेश करू नये', असेही त्यांनी कर्नाटक सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितले आहे. 

येत्या 10 नोव्हेंबर रोजी कर्नाटकमध्ये टिपू सुलतानची जयंती साजरी होणार आहे. 'अशा क्रूर हत्याऱ्याच्या जयंतीला मला आमंत्रित करू नये. ती माझ्यासाठी लाजिरवाणी गोष्ट असेल', अशी विनंतीही त्यांनी कर्नाटक सरकारला केली आहे. 

कर्नाटकमधील उत्तर कन्नड भागातून अनंतकुमार हेगडे पाच वेळा लोकसभेवर निवडून गेले आहेत. सत्ताधारी कॉंग्रेस साजरी करत असलेल्या टिपू सुलतानच्या जयंतीच्या कार्यक्रमावर गेली दोन वर्षे अनंतकुमार टीका करत आहेत. खासदार म्हणून शिष्टाचारानुसार सरकारी कार्यक्रमाच्या आमंत्रण पत्रिकेवर अनंतकुमार यांचे नाव असणे अनिवार्य असते; पण यंदा त्यांनी त्यांच्या नावाचा समावेश करण्यास नकार दिला आहे. 

'अशा उत्सवांनाही हेगडे राजकीय मुद्दा बनवू पाहत आहेत', असा आरोप कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केला. 'सरकारच्या वतीने आम्ही सर्व राजकीय नेत्यांना आमंत्रण देणार आहोत. त्याचा स्वीकार करायचा की नकार द्यायचा, हे त्यांनीच ठरवावे', असेही सिद्धरामय्या यांनी स्पष्ट केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

MI vs KKR Live IPL 2024 : अय्यरची 70 धावांची खेळी, मुंबईसमोर विजयासाठी 170 धावांच आव्हान

SSC-HSC Result 2024 : सीबीएसईचा दहावी-बारावीचा निकाल २० मे नंतर होणार जाहीर

West Indies T20 WC 24 Squad : विंडीजच्या संघात सगळे स्टार मात्र इन फॉर्म जादूगारच मिसिंग

Latest Marathi News Live Update: ...तर मोदींबरोबर गेलेलं का चालत नाही- अजित पवार

SCROLL FOR NEXT