National News Crime News Class Seventh Student threatened for Rape
National News Crime News Class Seventh Student threatened for Rape 
देश

सातवीतील विद्यार्थ्याकडून शिक्षिकेला बलात्काराची धमकी

वृत्तसंस्था

गुरुग्राम : हरियानातील गुरुग्राम येथील एका प्रसिद्ध विद्यालयात इयत्ता सातवीमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने त्याच्या वर्गशिक्षिका आणि तिच्या मुलीला बलात्काराची धमकी दिली आहे. संबंधित शिक्षिकेची मुलगी आणि संबंधित विद्यार्थ्यी हे दोघे एकाच वर्गात शिक्षण घेत आहेत. या गंभीर अशा प्रकाराने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

गुरुग्राम येथील एका नामांकित विद्यालयात हा प्रकार घडला. या अशा अनपेक्षित प्रकारामुळे संबंधित शिक्षिका आणि तिची मुलगी चांगलेच भयभीत झाले आहेत. या घटनेनंतर दैनंदिन कामासाठी शिक्षिका विद्यालयात येत आहे. मात्र, त्यांची मुलगी शाळेत पुन्हा येण्यास घाबरत आहे. दरम्यान, दुसरीकडे अशाच प्रकारची घटना घडली. यामध्ये आठवीमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने त्याच्या वर्गशिक्षिकेस कँडललाईट डिनरचा प्रस्ताव दिला. त्याचा हा प्रस्ताव इथेच थांबला नाही, तर त्याने त्यानंतर सेक्ससाठी विचारणाही केली. याबाबतचा ईमेलच त्याने संबंधित शिक्षिकेला केला. 

''याप्रकारानंतर शाळेला आणि संबंधित विद्यार्थ्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यांना पुढील चौकशीसाठी बोलवण्यात येणार आहे. त्यांच्यावर शाळा प्रशासनाकडून शिक्षिका, मुलांवर समुपदेशन केले जाणार आहे'', असे बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा शकुंतला धुल्ल यांनी सांगितले.  

दरम्यान, या दोन्ही प्रकारामुळे शाळा व्यवस्थापनाने यावर कडक पावले उचलली असून, याबाबत चौकशीचे आदेश दिले आहेत. यातील दोषींवर शाळा प्रशासनाकडून कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT