पद्मावती
पद्मावती 
देश

अखेर 'पद्मावती'चे प्रदर्शन लांबणीवर

वृत्तसंस्था

मुंबई : 'पद्मावती' या चित्रपटाला झालेल्या विरोधानंतर आज अखेर चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. 'पद्मावती' प्रदर्शित करण्याची तारीख पुढे ढकलण्यात आली असून, चित्रपट प्रदर्शनाची पुढील तारीख लवकरच जाहीर केली जाणार असल्याचे निर्माते व्हायाकॉम 18 यांनी आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. आपण स्वेच्छेने चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलत असल्याचेही ते म्हणाले. 

दीपिका पदुकोन, रणवीरसिंग आणि शाहिद कपूर यांची प्रमुख भूमिका असलेला 'पद्मावती' हा चित्रपट 1 डिसेंबरला प्रदर्शित होणार होता. मात्र, या चित्रपटात राणी पद्मिनी आणि मुघल शासक सम्राट अलाउद्दीन खिलजी यांच्यातील संबंध चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आल्याने विविध राजपूत संघटनांनी यावर तीव्र आक्षेप घेत निषेध केला होता. त्यामुळे चित्रपट पद्मावती वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. याशिवाय चित्रपटासाठी सेन्सॉर बोर्डकडून प्रमाणपत्रही मिळाले नव्हते. तसेच चित्रपटाचे मीडिया स्क्रीनिंग केल्यामुळे सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी याबाबत नाराज होते. 

दरम्यान, या सर्व घडामोडींनंतर अखेर या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. मात्र, या चित्रपटाच्या प्रदर्शनाची पुढील तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

Lok Sabha Election 2024 : डमी नावाच्या उमेदवारांना निवडणूक लढविण्यास मनाई करा; प्रकरण कोर्टात पोहचलं पण...

SCROLL FOR NEXT