VOTE
VOTE 
देश

'यूपी'त भाजप आघाडीवर ; स्थानिक स्वराज संस्था निकाल Live

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतमोजणीला सकाळी सुरवात झाली असून, सत्ताधारी भाजप सध्या आघाडीवर आहे. या निकालानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नऊ महिन्यांच्या कामगिरीचे चित्र आता स्पष्ट होणार आहे. गुजरात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकांचे निकाल महत्वाचे मानले जात आहेत. 

उत्तर प्रदेश स्थानिक स्वराज्य संस्थांचे मतदान 22, 26 आणि 29 नोव्हेंबर या कालावधीत तीन टप्प्यांत घेण्यात आले होते. हे मतदान राज्यातील 36,269 मतदान केंद्रात पार पडले. राज्यातील 3.36 कोटी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून, राज्यात 52.4 टक्के इतके मतदान झाले. राज्यातील 79,113 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत कैद झाले आहे. या निवडणुकांच्या प्रचारासाठी योगी आदित्यनाथ यांनी 16 हून अधिक ठिकाणी प्रचारसभा घेतल्या होत्या.

आज या निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळीपासून सुरवात झाली आहे. सहारनपूर भागात बहुजन समाजवादी पक्षाचे महापौरपदाचे उमेदवार फझल उर रेहमान यांनी तिसऱ्या फेरीत 17,333 मतांनी आघाडी घेतली आहे. तर भाजपच्या संजीव वालिया यांना 12,787 मते मिळाली आहेत. तसेच काँग्रेसचे शशी वालिया यांना 6,117 मते मिळाली आहेत.

याशिवाय मोरादाबादमध्ये भाजपचे महापौरपदाचे उमेदवाराने 6,000 मतांची आघाडी घेतली आहे. मथुरामध्ये काँग्रेस, फिरोजाबादमध्ये बसपा तर आग्रामध्ये भाजप सध्या आघाडीवर आहे. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: निवडणुकीत पाकिस्तानची एन्ट्री! 'राजकुमाराला पंतप्रधान बनवण्यास पाकिस्तान आतुर', मोदींचा राहुल यांच्यावर निशाणा

Ankita Lokhande : "तिला स्टुडंट ऑफ द इयर 3ची ऑफर मिळालीच नव्हती"; अफवांवर अंकिताच्या टीमकडून स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : “लव्ह जिहाद, भू जिहादनंतर आता व्होट जिहाद”, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर टीका

Akshaya Tritiya 2024 : कधी आहे अक्षय्य तृतीया? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्व

Lok Sabha Election: उन्हाचा कहर वाढला! निवडणूक आयोग सतर्क, बिहारनंतर या राज्यातही मतदानाची वेळ वाढवली

SCROLL FOR NEXT