vande mataram 
देश

'वंदे मातरम्'मुळे मौलानांनी केले समाजातून बहिष्कृत

वृत्तसंस्था

आग्रा : भारतात राहणारी प्रत्येक व्यक्ती आपल्या देशाचे राष्ट्रगीत, वंदे मातरम् आणि राष्ट्रध्वज अभिमानाने उंचावतो. मात्र, असे करणे एका मुस्लिम व्यक्तीला चांगलेच महागात पडले आहे. 'वंदे मातरम्' हे गीत गायल्याने मौलानांकडून त्याला समाजातून बहिष्कृत करण्यात आले आहे. याप्रकारानंतर प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. 

आग्रा येथे राहणाऱ्या 36 वर्षीय गुलचमन शेरवानी यांनी तिरंगा असलेले कपडे परिधान करतात. तसेच त्यांची मुले 'वंदे मातरम्' हे गीत अनेकदा गातात. त्यामुळे येथील समाजाने याला विरोध केला. याशिवाय दिल्लीतील जामा मस्जिदच्या इमाम मौलाना अहमद बुखारी यांनी त्यांच्याविरोधात फतवाही जारी केला आहे. शेरवानी यांना हा फतवा मिळाल्यानंतरही त्यांनी वंदे मातरम् गाण्याचे सोडले नाही. त्यामुळे त्यांना समाजातून बहिष्कृत करण्यात आले आहे. तसेच त्यांच्या मुलांनाही शाळेतून काढून टाकण्यात आले आहे. 

''शेरवानी यांच्या मुलांनी गेल्या वर्षी शाळेत प्रवेश घेतला होता. त्यांची मुले वंदे मातरम् गात होती. त्यामुळे दुसऱ्या समुदायाकडून याला विरोध केला जात होता. याविरोधातून शाळा सोडण्यासाठी त्यांच्या मुलांवर दबाव टाकण्यात येत होता. त्यामुळे त्यांना शाळेतून काढून टाकण्यात आले. त्यांना शाळेतून काढले नसते तर इतर विद्यार्थी शाळा सोडून गेले असते. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला", असे शाळा व्यवस्थापनाने सांगितले. 

''माझ्या एका मुलाचा जन्म 15 ऑगस्ट तर दुसऱ्याचा जन्म 26 जानेवारीला झाला. त्यावरून माझे देशावरील प्रेम जाहीर होत आहे. तसेच माझ्या विवाहाप्रसंगी 'वंदे मातरम्' लावण्यात आले होते आणि त्यावरच लोकांनी नृत्य केले होते'', असे गुलचमन शेरवानी यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Officer Mobile Video : खासदारांच्या काजू-बदामनंतर आता अधिकाऱ्यांचा असंवेदनशील चेहरा; कृषिमंत्र्यांच्या दुष्काळ आढावा बैठकीत मोबाईलमध्ये दंग

Kannad Teacher Credit Society: आमसभेत आर्थिक अनियमिततेचे आरोप; चर्चा सुरू असतानाच राष्ट्रगीताने सभा गुंडाळल्याचा दावा

Martyr Wife Success Story: १८ वर्षांपूर्वी पती गमावला; आज त्याच वर्दीत देशसेवेची जबाबदारी, वीरपत्‍नी कल्पना पवारांचा संघर्षमय अन् प्रेरणादायी प्रवास..

Marathi News Live Updates : पैठणमधील हर्षी खुर्द येथे सव्वीस वर्षीय तरुणाने गळफास घेऊन जीवन संपवले

India Pakistan Passports : अंबरनाथमध्ये एकाच व्यक्तीकडे भारत-पाकिस्तानचे पासपोर्ट; मुंबई ATS कडूनही चौकशी सुरू

SCROLL FOR NEXT