rail
rail 
देश

उत्तर प्रदेशात रेल्वे घसरली; तीन मृत्युमुखी

वृत्तसंस्था

अलाहाबाद : 'वास्को-द-गामा-पटना' एक्स्प्रेसचे 13 डबे रुळावरून घसरले. ही घटना उत्तर प्रदेशच्या माणिकपूर रेल्वे स्थानकानजीक पहाटे 4:18 च्यादरम्यान घडली. या अपघातात 3 प्रवाशांचा मृत्यू झाला असून, 7 प्रवासी जखमी झाले आहेत. यातील जखमींवर नजीकच्या रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरु आहेत.

वास्को-द-गामा गोव्याहून पटनाला जात होती. यादरम्यान या रेल्वेचा माणिकपूर येथे अपघात झाला. या अपघाताची माहिती मिळताच रेल्वे अधिकाऱ्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. तसेच या प्रवाशांच्या मदतीसाठी विशेष बस सोडण्यात आल्या असून, यातील जखमींच्या मदतीसाठी विशेष पथकाला पाचारण करण्यात आले आहे. या दुर्घटनेनंतर पटना-अलाहाबाद रेल्वे सेवेवर परिणाम झाला आहे.

रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख तर जखमींना 1 लाखांची मदत जाहीर केली आहे. या दुर्घटनेनंतर तातडीने बचावकार्य सुरु करण्यात आले. या दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेशही दिले आहेत. मृतांच्या कुटुंबीयांचे आम्ही सांत्वन करतो, असे गोयल म्हणाले.

याबाबत अलाहाबाद विभागाचे एस. एन. सावंत म्हणाले, या दुर्घटनेत तीन प्रवाशांचा मृत्यू झाला असून, सात प्रवासी जखमी झाले आहेत. यातील दोघांची माहिती मिळाली असून, राम स्वरुप आणि दीपक पटेल हे दोघे पिता-पुत्र आहेत. बेटिया भागातील रहिवासी असल्याची माहिती मिळत आहे. आणखी एका जखमी प्रवाशाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

"जखमींपैकी दोघे गंभीर असून, त्यांना चित्रकूटच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच यातील सात किरकोळ जखमींना माणिकपूर येथे उपचारांसाठी दाखल करण्यात आले'', अशी माहिती चित्रकूटचे पोलिस अधीक्षक प्रताप गोपेंद्र सिंह यांनी दिली.  

उत्तर विभागाचे रेल्वे जनसंपर्क अधिकारी अमित मलविय म्हणाले, ''या एक्स्प्रेसचे एस3-एस11 आणि दोन जनरल आणि दोन अतिरिक्त डबे असे एकूण 13 डबे उत्तर प्रदेशाच्या माणिकपूर रेल्वे स्थानकानजीक घसरले. या घटनेनंतर जखमींना तातडीने उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, बचावकार्य सुरु आहे''. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'काँग्रेसने दोनदा बाबासाहेबांचा पराभव केला, प्रकाश आंबेडकरांना सोडून दिलं'; बावनकुळेंचा जोरदार प्रहार

Pune Loksabha Constituency : प्रांतिक तैलिक महासभेचा भाजपचे उमेदवार मोहोळ यांना पाठिंबा जाहीर

Indian Ocean : सगळ्यात वेगाने तापतोय हिंदी महासागर; ग्लोबल वॉर्मिंगचा अरबी समुद्राला बसणार मोठा फटका! भारताला किती धोका?

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : व्होट बँकेसाठी काँग्रेसने राम मंदिराचा अपमान केला - पंतप्रधान मोदी

SCROLL FOR NEXT