Marathwada muktisangram din Esakal
देश

Marathwada muktisangram din: मराठवाडा हे नाव कसे पडले? वाचा रंजक इतिहास

महाजनपदात बहुतांश लोकं महाराष्ट्री प्राकृत भाषा बोलणारी होती.

दिपाली सुसर

मराठवाडा स्वातंत्र्य होऊन 17 सप्टेंबर रोजी 74 वर्षे पूर्ण होऊन 75 वर्षात प्रवेश करेल. त्यानिमित्ताने मराठवाडा काय होता? इथे निजामशाही कशी आली ? त्या निजामशाहीच्या काळात आताच्या मराठवाड्यात काय परिस्थिती होती. आणि निजामशाही विरोधात जो लढा उभा राहिला तो कसा उभा राहिला आणि अखेर 17 सप्टेंबर 1948 रोजी आपला मराठवाडा निजामशाहीच्या जोखडातून मुक्त झाला.

आता बघू या आपल्या या भागाचे मराठवाडा हे नाव कसे पडले याविषयीची सविस्तर माहिती आज आपण या लेखात जाणून घेणार आहोत. सम्राट अशोकाच्या 16 महाजनपदा पैकी दोन महाजनपदे एक अश्मक आणि दुसरे मूलक हे गोदावरीच्या खोऱ्यात नांदणारे होते. त्यामुळे या दोन्ही महाजनपदात बहुतांश लोकं महाराष्ट्री प्राकृत भाषा बोलणारी होती.

सातवाहन राजा हाल यांनी 700 गाथा एकत्र करून संपादित केलेला ” गायासप्तशती ” म्हणजेच गाथा सप्तशती ही प्राकृत मधून असलेली निर्मिती मध्ये गोदावरी खोऱ्यातील लोकांचे लोक जीवन प्रतिबिंबीत झाले आपल्याला दिसुन येते. या वर्णनातुन एक गोष्ट आपल्या स्पष्ट दिसुन येते की, हा प्रदेश म्हणजे मराठीचे आद्य रूप महाराष्ट्री प्राकृत बोलणारा प्रदेश होता.

पुढे कालांतराने अनेकांनी या प्रदेशावर आपली हुकूमत गाजवली आणि 1724 मध्ये दिल्लीची सुभेदार निजाम उल मुल्क या निजामशहाने हैद्राबाद मध्ये निजामशाही स्थापन केली. या निजामशाहीत तीन भाषा बोलणारे प्रदेश होते एक  म्हणजे तेलगू ( आंध्र ), दुसरी कन्नड ( कर्नाटक ) आणि तिसरी आपली मराठी ( मराठवाडा ) यातील लातूर म्हणजे पूर्वाश्रमिचा उस्मानाबाद जिल्हा मराठी बोलणाऱ्या लोकांचा शेवटचा भाग होता.

म्हणजे निजामाच्या काळात  त्याने भाषेप्रमाणे प्रदेशाची नावे ठेवली होती, म्हणून मराठी बोलणाऱ्या लोकांचा समुह या भागात मोठ्या प्रमाणात राहतो त्या भागाला मराठवाडा हे नाव देण्यात आलं आणि मग त्याच नावाने हा प्रदेश ओळखल्या जाऊ लागला.

( संदर्भ :-अर्ली हिस्ट्री ऑफ डेक्कन,- यझदानी, मोघलकालीन मराठवाडा,- ल. गो. काळे, छत्रपती शिवाजी महाराज – ग. ह. खरे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Gokul Election 2026 : 'गोकुळ'च्या सत्ताकारणाचा काउंटडाऊन सुरू! अंतिम मतदार यादीची तारीख ठरली; उमेदवारी अर्जाचा मुहूर्तही निश्चित, 410 संस्थांच्या हरकतीवर सुनावणी

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : कात्रज घाटात भाजपशी संबंधित निवडणूक साहित्याचा खच; स्वच्छता ग्रुपकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT