Mass atrocities on girl in Uttar Pradesh Mass atrocities on girl in Uttar Pradesh
देश

मुलीचे अपहरण, धर्मांतर, लग्न अन् सामूहिक बलात्कार

सकाळ डिजिटल टीम

गोंडा : उत्तर प्रदेशातील गोंडा येथील मुलीचे अपहरण करून मुंबईत नेत धर्मांतर केले. अपहरण करणाऱ्या दुसऱ्या समाजातील मुलाने धर्म परिवर्तन करून मुलीशी लग्न केले. त्यानंतर तिला मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी नेले. यावेळी त्याच्या साथीदारांनी मुलीवर बलात्कार (Mass Atrocities) केला. काही दिवसांनी तिला गोंडा स्थानकावर सोडले. पीडित कुटुंबाने दाद मागितल्यावर एसपींनी कारवाईचे आदेश दिले. यानंतर पोलिसांनी चार आरोपींविरुद्ध सामूहिक बलात्कारासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

गावात राहणारा जावेद अनेकदा बोलायचा. तो मुंबईत काम करतो. तो नेहमी मुंबईला बोलवायचा. मात्र, मी नकार देत होती, असे पीडित मुलीने म्हटले आहे. १४ जून रोजी जावेदने मुलीला बेशुद्ध केले. शुद्ध आली तेव्हा ती मुंबईतील एका खोलीत होती. मुंबईत राहणाऱ्या जावेदच्या मित्रांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार (Mass Atrocities) केला, असे वडिलांनी तक्रारीत म्हटले आहे.

प्रकरण बिघडत असल्याचे पाहून २१ जून रोजी जावेदने मुलीला कर्नालगंज रेल्वे स्थानकावर (Railway station) सोडले. एवढेच नाही तर जातिवाचक शब्द वापरून धमकीही दिली. त्याच दिवशी त्यांनी नगर चौकीत मुलीसोबत घडलेल्या घटनेची माहिती दिली. मात्र, पोलिसांनी कारवाई केली नाही. यानंतर वडिलांनी एसपींची भेट घेऊन न्यायाची याचना केली. आरोपींविरुद्ध सामूहिक बलात्कारासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केल्याचे पोलिस समशेर बहादूर सिंग यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT