atyachar atyachar
देश

नात्याला काळिमा! भाच्याने मित्रासोबत मामीवर केला सामूहिक बलात्कार

दोघांनी मामीला पिण्यासाठी पाणी दिले. यानंतर मामीला झोप येऊ लागली

सकाळ डिजिटल टीम

ग्वाल्हेर : भाच्याने मामीला घरी बोलावून नशा मिसळलेले पाणी प्यायला दिले. मामीची शुद्ध गेल्यानंतर भाच्याने तिचे नग्न व्हिडिओ (Nude video) काढले. हे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत मित्रासह बलात्कार (Mass atrocities) केला. नात्याला काळिमा फासणारी घटना मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये घडली. तक्रारीवरून पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ वर्षीय महिला पतीसोबत ग्वाल्हेरच्या गोल का मंदिर येथे असलेल्या हनुमाननगरमध्ये भाड्याने राहते. तिचा नवरा मजुरीचे काम करतो. त्यांचा भासा काही अंतरावरच राहतो. ९ जानेवारीला सायंकाळी भाच्याने मामीला फोन करून घरी येण्यास सांगितले. मामी भाच्याच्या घरी पोहोचली तेव्हा मित्र आकाश माहूर तिथे होता.

दोघांनी मामीला पिण्यासाठी पाणी दिले. यानंतर मामीला झोप येऊ लागली. त्याचवेळी भासा आणि मित्राने मामीचा न्यूड व्हिडिओ काढला. यानंतर दोघांनी मामीवर सामूहिक बलात्कार (Mass atrocities) केला. दोन्ही आरोपींनी कोणालाही काही सांगितले तर व्हिडिओ (Nude video) व्हायरल करून पतीला ठार मारण्याची धमकी दिली. यानंतर घाबरलेली महिला घरी परतली. मात्र, भाच्याने तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.

मामाच्या मोबाईलवर पाठवला न्यूड व्हिडिओ

मंगळवारी भाच्याने फोन करून मामीला पुन्हा घरी येण्यास सांगितले. मामी घरी आल्यानंतर शारीरिक संबंधाची (Mass atrocities) मागणी केली. मात्र, तिने नकार दिला. भाच्याने मामाच्या मोबाईलवर न्यूड व्हिडिओ (Nude video) पाठवला. महिलेच्या पतीने घरी पोहोचताच तिच्याशी वाद सुरू केला. त्यानंतर महिलेने प्रकार सांगितला. यानंतर दोघांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ सामूहिक बलात्कार आणि ब्लॅकमेलिंगचा गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक केली. टीआय विनय शर्मा यांनी सांगितले की, आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : 'महाराष्ट्र चालवण्याची विठुरायाने शक्ती द्यावी', मुख्यमंत्री फडणवीसांनी पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT