Secunderabad Club ANI
देश

१४४ वर्षे जुन्या क्लबची इमारत आगीत खाक; कोट्यवधींचे नुकसान

सकाळ डिजिटल टीम

देशातील सर्वात जुन्या पाच क्लब पैकी एक असणाऱ्या सिकंदराबाद क्लबच्या इमारतीला रविवारी पहाटे आग लागली.

हैदराबाद - देशातील (India) सर्वात जुन्या पाच क्लब पैकी एक असणाऱ्या सिकंदराबाद (Secunderabad) क्लबच्या इमारतीला रविवारी पहाटे आग लागली. आग इतकी भीषण होती की या आगीत इमारत जळून खाक झाली आहे. यात कोट्यवधींचे नुकसान झाल्याचं म्हटलं जात आहे. हैदराबादमध्ये (Hyderbad) असलेल्या क्लबच्या इमारतीत पहाटे ३ च्या सुमारास आगीने रौद्र रुप धारण केलं, सकाळी सातच्या सुमारास आग आटोक्यात आली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, मध्यरात्री इमारतीला भीषण आग लागली. तीनच्या सुमारासर आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. अखेर ४ तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. सध्या बचावकार्य सुरु असून यात जिवित हानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणावर वित्त हानी झाली आहे.

सध्या सुट्ट्या असल्यामुळे क्लबच्या इमारतीमध्ये कोणीही पाहुणे नव्हते. जिवित हानी नसली तरी अंदाजे २० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचं म्हटलं जात आहे. आग लागल्यानं इमारत जळून खाक झाली आहे. आगीचं कारण अद्याप समोर आलेलं नाही, मात्र शॉर्ट सर्किटने आग लागल्याचं सांगितलं जात आहे.

इंग्रजांच्या काळात १८७८ मध्ये हा क्लब स्थापन करण्यात आला होता. जवळपास १४४ वर्षांपूर्वीचा हा क्लब २० एकर परिसरात पसरला आहे. देशातील पाच सर्वात मोठ्या आणि प्रतिष्ठित क्लबपैकी एक असा हा क्लब आहे. याठिकाणी शहरातील मोठे अधिकारी, श्रीमंत उद्योगपती येतात. सर्वसामान्य लोकांना या क्लबमध्ये प्रवेश दिला जात नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story: अंगणवाडी सेविका आईच्या Gen Z लेकाने बदलले कुटुंबाचे नशीब; UPSCत ५७४ वा क्रमांक मिळवत झाला IPS, सर्व भावूक

‘आराधी आलाय नवा ग नवा’ ऐश्वर्या नारकर अन् तितीक्षा तावडेंचा धमाकेदार डान्स, नेटकरी म्हणाले... ‘एक स्वामिनी तर दुसरी दामिनी…’ Video

Rajya Sabha Candidates: राज्यसभा निवडणुकीत भाजपचा सस्पेन्स संपला; दोन राज्यांत उमेदवारांची घोषणा, कोण आहेत चेहरे? एक तर अभिनेत्री

PM Kisan: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! पीएम किसानचा २४वा हप्ता कधी येणार? नवी अपडेट समोर

Prithviraj Chavan : ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा देऊन चालणार नाही, तर त्यांना...; पृथ्वीराज चव्हाणांचे घणाघाती आरोप, फौजदारी कारवाईचीही मागणी

SCROLL FOR NEXT