देश

देशात मे २०२० नंतर कोरोना मृतांचा नीचांक

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - देशात रविवारी गेल्या २४ तासांमधील कोरोना मृतांची संख्या ७८ नोंदविण्यात आली. गेल्या वर्षी एक मेनंतर हा नीचांक आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही आकडेवारी जाहीर केली आहे. बहुसंख्य नव्या रुग्णांची नोंद केरळ आणि महाराष्ट्र येथे झाली. केरळमध्ये पाच हजार ९४२, तर महाराष्ट्रात दोन हजार ७६८ रुग्ण आढळले. उर्वरीत देशातील आकडा तीन हजार ३४९ इतका होता. देशातील मृतांची एकूण संख्या दीड लाखच्यावर गेली आहे. एकूण रुग्णांचा आकडा एक कोटी आठ लाख इतका आहे. उपचार सुरु असलेल्या रुग्णांचा आकडा सुद्धा कमी झाला असून तो एक लाख ४८ हजार इतका आहे, एकूण रुग्णांच्या तुलनेत १.३७ टक्के इतका आहे. शनिवारी दोन लाख २० हजार आरोग्य व अत्यावशक सेवेतील कर्मचाऱ्यांना लस टोचण्यात आली.

आणखी सात लसी
केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी सांगितले की, आणखी सात लसी विकसित करण्याची प्रक्रिया देशात सुरु आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला लस देता यावी म्हणून आणखी संशोधन सुरु आहे. देश केवळ दोन लसींवर अवलंबून नाही. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

 Kolhapur Corporation : ‘शड्डू’ घुमला, ‘ताळ’ सुटला; नवीन नगरसेवकांवरच ज्येष्ठांना सांभाळून घेण्याची वेळ

Education News: VIT ची दमदार कामगिरी; २०२६ बॅचसाठी १० हजारांहून अधिक प्लेसमेंट ऑफर्स

Navi Mumbai: शेकडो व्यापाऱ्यांवर कडक कारवाई होणार, कारण काय?

Latest Marathi News Live Update : हडपसरमध्ये वॉचमनला मारहाण; दारूच्या नशेत दोघांचा हल्ला

जीजी झाली मॉडर्न! 'येड लागलं प्रेमाचं' मधून एक्झिट घेताच नव्या मालिकेत दिसणार नीना कुळकर्णी; नेटकरी चकीत

SCROLL FOR NEXT