mayawati
mayawati esakal
देश

मायावती आग्र्याहून फुंकणार निवडणुकीचा बिगुल! 2 फेब्रुवारीला जाहीर सभा

सकाळ डिजिटल टीम

UP Election 2022 : बहुजन समाज पक्षाच्या (BSP) सर्वेसर्वा मायावती (mayawati) 2 फेब्रुवारीला आग्रा (Agra) येथे जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. पक्षाचे सरचिटणीस सतीश चंद्र मिश्रा यांनी मंगळवारी (ता.२५) ट्विट करून ही माहिती दिली.

जाहीर सभांची माहिती लवकरच

पक्षाच्या सरचिटणीसांनी ट्विट केले की, 2 फेब्रुवारी 2022 रोजी बसपच्या राष्ट्रीय अध्यक्षा, यूपीच्या माजी मुख्यमंत्री मायावती कोविड नियमांचे पालन करून आग्रा येथे जाहीर सभेला संबोधित करतील. जाहीर सभेची वेळ व ठिकाण तसेच आगामी जाहीर सभांची माहिती प्रसारमाध्यमांना लवकरच उपलब्ध करून दिली जाईल, असे ते म्हणाले.

भक्कम व्होटबँक

आतापर्यंत मायावती यूपी निवडणुकीत इतर राजकीय पक्षांइतक्या सक्रिय राहिलेल्या नाहीत. मात्र, त्यांची भक्कम व्होटबँक लक्षात घेता तेच आजही फरक करणार असल्याचे मानले जात आहे. मायावती ट्विटरवर सतत सक्रिय असतात. सोमवारी एका ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, भीती, भ्रष्टाचार, भेदभाव, जीवित आणि संपत्ती, धर्माची असुरक्षितता म्हणजेच यूपीमधील खराब कायदा आणि सुव्यवस्था, बेरोजगारी आणि लाखोंचे स्थलांतरण तसेच लोकसंख्येच्या सर्वात मोठ्या समस्या या राज्यात आहेत, ज्या वाढत आहेत. ज्यामुळे समाज आणि राज्य मागे पडत आहे. हे अतिशय दुःखद आहे

बसपा सरकारच्या काळात केलेल्या कामाची आठवण

मायावतींनी त्यांच्या सरकारची आठवणही करून दिली. त्या म्हणाले की, बसपा सरकारच्या काळात अडीच लाख गरीब कुटुंबांना मूलभूत सुविधा देण्यात आल्या. याशिवाय आणखी १५ ते २० लाख घरे बांधण्याची तयारी सुरू होती. सरकार बदलल्याने हे काम अपूर्ण राहिले. याचेच भांडवल करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. त्यांनी स्वतःसाठी काय केले आहे?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT Live Score: बेंगळुरू - गुजरात येणार आमने-सामने; स्पर्धेतील आव्हान टिकवण्याचं दोन्ही संघांसमोर आव्हान

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

Akshaya Tritiya 2024 : कुंडलीतील पितृदोष दूर करण्यासाठी अक्षय्य तृतीयेला करा हे उपाय, घरात नांदेल सुख-शांती 

SCROLL FOR NEXT