Crime esakal
देश

Crime News : आदिवासी महिलेचे धक्कादायक कृत्य; आठ महिन्यांच्या मुलीची केली विक्री

दुसरी मुलगीच झाल्याने नाराज झालेल्या आदिवासी महिलने आपल्या आठ महिन्यांच्या मुलीची एका जोडप्याला अवघ्या ८०० रुपयांत विक्री केल्याची धक्कादायक घटना उघड आली.

पीटीआय

मयूरभंज - ओडिशात दुसरी मुलगीच झाल्याने नाराज झालेल्या आदिवासी महिलने आपल्या आठ महिन्यांच्या मुलीची एका जोडप्याला अवघ्या ८०० रुपयांत विक्री केल्याची धक्कादायक घटना उघड आली आहे. कारामी मुर्मू असे या महिलेचे नाव असून ती, खुंटा जिल्ह्यातील मयूरभंजची रहिवासी आहे.

कारामीचा पती तमिळनाडूत कामगार म्हणून काम करत असून त्याला या घटनेची माहिती नसल्याचे पोलिसांनी सांगितले. तिला पहिली मुलगीच असून दुसऱ्यांदाही मुलगीच झाल्याने ती नाराज होती. त्यातून मुलीचे संगोपन कसे करायचे, याची चिंताही तिने शेजारी राहणाऱ्या माही मुर्मूकडे व्यक्त केली होती.

त्यानंतर माहीने करामीच्या मुलीची विक्री करण्यासाठी ग्राहक शोधला. त्यानंतर कारामीने बिप्रचरणपूरच्या फुलामनी आणि अखिल मरांडी या जोडप्याला मुलीगी विकली. घरी परतल्यानंतर मुलीच्या वडिलांनी मुलीबद्दल तिच्याकडे विचारणा केली. त्यावेळी, तिचा मृत्यू झाल्याचे करामीने सांगितले. मात्र, शेजाऱ्यांनी त्याला मुलीची विक्री झाल्याचे सांगितले.

त्यानंतर, त्याने खुंटा पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य ओळखत पोलिसांनी तातडीचे कारामीसह मुलीची खरेदी करणारे जोडपे व मध्यस्थ असलेल्या माही मुर्मूलाही अटक केली.

ही महिला मुलीला घेऊन बाजारात गेली होती. मात्र, ती एकटीच घरी परतल्याने गावकऱ्यांनी मुलीबद्दल विचारणा केली. यावेळी, तिचा मृत्यू झाल्याचे तिने सांगितले. महिलेला व मुलीला विकत घेणाऱ्यांना अटक केली आहे. तसेच मुलीची रवानगी बालसंगोपन केंद्रात करण्यात आली आहे.

- बट्टुला गंगाधर, पोलिस अधीक्षक, मयूरभंज, ओडिशा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! दसऱ्यानंतर मुंबईत महत्त्वाची बैठक; पगारवाढ आणि DAबाबत काय चर्चा होणार?

VIDEO: दुष्काळाच्या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर; महायुतीत नाराजीनाट्याची चर्चा

Masur Fox Attack: मसूरमध्ये कोल्ह्यांची दहशत! वृद्धासह चिमुकली, महिला आणि शेतकऱ्यावर हल्ले

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरात अंबाबाई मंदिरात पुजाऱ्यांचं आंदोलन सुरु; देवस्थान समितीविरोधात पुजारी आक्रमक

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या ट्रकला आग

SCROLL FOR NEXT