93 year old university  esakal
देश

Ukraine MBBS : युक्रेनऐवजी 'या' देशातील ९३ वर्षे जुन्या विद्यापीठात MBBS करणाऱ्या भारतीयांची संख्या वाढली, 'हे' आहे कारण

युक्रेन आणि रशियाच्या युद्धाचा परिणाम हा जगातील अनेक क्षेत्रांवर झाला.

Monika Lonkar –Kumbhar

Ukraine MBBS : युक्रेन आणि रशियाच्या युद्धाचा परिणाम हा जगभरातील अनेक क्षेत्रांवर झाला. या  युद्धाचा परिणाम अर्थव्यवस्थेसोबत मेडिकल शिक्षणावर देखील झाला. युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी भारतीय विद्यार्थ्यांची दरवर्षी पसंती असायची.

मात्र, युक्रेन आणि रशियामध्ये झालेल्या युद्धामुळे एमबीबीएस करू इच्छिणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी युक्रेनचे दरवाजे बंद झाले. युक्रेनचे दरवाजे बंद झाल्यानंतर याचा परिणाम असा झाला की, आता भारतीय विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी उझबेकिस्तानमधील ९३ वर्षीय जुन्या समरकंद स्टेट मेडिकल कॉलेजला पसंती देत आहेत. या विद्यापीठात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे.

या संदर्भातली माहिती समरकंद वैद्यकीय विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. जाफर अमिनोव यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना दिली. अमिनोव म्हणाले की, 'भारतीय विद्यार्थ्यांची संख्या ही झपाट्याने वाढली आहे, हा ट्रेंड कायम रहावा आणि विद्यार्थ्यांना कोणत्याही गैरसोयीला सामोरे जावे लागू नये, यासाठी आम्ही पुरेशी व्यवस्था करत आहोत'.

पुढे ते म्हणाले की, या वर्षी मेडिकल कॉलेजमध्ये ४० हून अधिक भारतीय शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाविद्यालयात केवळ इंग्रजीतूनच अध्यापन केले जाते. हे भारतीय शिक्षक आम्हाला विद्यार्थ्यांचे उत्तम व्यवस्थापन करण्यास देखील मदत करतात. विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.

विशेष म्हणजे, २०२१ पर्यंत या विद्यापीठात १०० ते १५० भारतीय विद्यार्थी शिक्षणासाठी येत होते. त्याचवेळी ही संख्या २०२३ मध्ये ३ हजार पर्यंत वाढली.

महत्वाची बाब म्हणजे या विद्यापीठाने १००० हून अधिक भारतीय विद्यार्थ्यांना देखील सामावून घेतले आहे, जे पूर्वी युक्रेनमधील विविध विद्यापीठांमध्ये शिकत होते. मात्र, युक्रेन आणि रशिया मध्ये झालेल्या युद्धामुळे त्या विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण अर्धवट सोडावे लागले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 1,500 अंकांनी खाली; कारण काय? कोणत्या शेअर्सला फटका?

IPL 2026: राजस्थान एक्स्प्रेसला अधिक संधी सातत्याचा अभाव असलेल्या सनरायझर्स हैदराबादविरुद्ध आज सामना, कशी असेल प्लेइंग-११

Latest Marathi News Live Update : धाराशिवमध्ये शिवसेनेतील गटबाजी पुन्हा उफाळली,नजर कैदेत ठेवलेले शिवसैनिक आक्रमक

Gadchiroli News: सेंद्रीय शेती, किचन गार्डनच्या माध्यमातून नेहारपायली पुढे; गावाचा एकोपा यशाची गुरुकिल्ली; सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम

Pavangad Fort Shivling Discovery : पावनगडावरील दर्ग्याखालील ढिगाऱ्यात सापडलं एक फूट रुंदीचं पुरातन शिवलिंग, किल्ल्यावरील प्राचीन हिंदू संस्कृतीचा वारसा अधोरेखित!

SCROLL FOR NEXT