mcd esakal
देश

"आप सरकारने आरोग्य क्षेत्रात चांगले काम केले, म्हणूनच तिहारमध्ये मसाज...": जेपी नड्डा यांनी 'आप'ला टोला

आदमी पक्षाचे सरकार सर्वसामान्यांच्या हिताच्या विरोधात काम करत आहे

रुपेश नामदास

MCD Elections: भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी रविवारी आरोप केला आहे की, देश प्रगतीच्या मार्गावर पुढे जात आहे, मात्र आम आदमी पक्षाचे सरकार सर्वसामान्यांच्या हिताच्या विरोधात काम करत असल्याने दिल्लीत विकास होत नाही. नड्डा यांनी रविवारी दिल्लीच्या वजीरपूर भागात महापालिका निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचा घरोघरी प्रचार केला.

भाजपच्या प्रचाराचा एक भाग म्हणून, नड्डा यांनी स्थानिक लोकांशी संवाद साधला आणि पक्षाच्या जाहिरनाम्याच्या प्रती दिल्या. आप नेते आणि दिल्लीचे मंत्री सत्येंद्र जैन यांना तिहार तुरुंगात व्हीआयपी ट्रीटमेंट मिळाल्याच्या वादावरून नड्डा यांनी अरविंद केजरीवाल सरकारवर निशाणा साधला. जैन तिहार तुरुंगात मसाज घेत असल्याच्या कथित व्हिडिओचा संदर्भ देत ते म्हणाले की, "त्यांनी आरोग्य क्षेत्रात चांगले काम केले आहे आणि तिहारमध्ये मसाज सेंटर उघडले आहे"

आपचे नेते आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी जैन यांच्या बचावासाठी पत्रकार परिषद घेवून सांगितल की जैन यांना पाठीच्या कण्याला दुखापत झाल्यामुळे तुरुंगात फिजिओथेरपिस्टकडून उपचार केले जात आहेत. सिसोदिया यांच्या या प्रतिक्रियेवर नड्डा म्हणाले, "त्यांनी शिक्षण क्षेत्रातही चांगले काम केले आहे आणि बलात्कार करणाऱ्याला थेरपिस्ट बनवले आहे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जंतर मंतर आंदोलन स्थळांच्या यादीतून वगळलं, दिले ३ पर्याय; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारसीनंतर दिल्ली पोलिसांचा निर्णय

Pune News: चाकणमध्ये हृदयद्रावक घटना! मोबाईलवरून वाद, वडिलांच्या दोन थपडा अन् १७ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू, सायकलनेच दिला सुगावा..

माधुरी दीक्षितने डॉक्टर असलेल्या नेनेंसोबत लग्न का केलं? सोनाली बेंद्रेसमोर सांगितलं खरं कारण; म्हणाली- मी अशा माणसाशी लग्न केलंत जो...

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील आंदोलनांसाठी जंतरमंतर बंद; निदर्शनांसाठी तीन नवी ठिकाणे निश्चित

Panvel News: पनवेलचा 'ताप' वाढला! धोक्याची घंटा; पर्यावरण अहवालात दीड अंशाच्या वृद्धीची नोंद

SCROLL FOR NEXT