देश

"ई फार्मसी'विरुध्द 28 सप्टेंबरला बेळगाव जिल्ह्यातील मेडिकल बंद 

महेश काशीद

बेळगाव - केंद्र सरकारतर्फे "ई फार्मसी' व्यवस्था जारी करण्याच्या हालचाली सुरु आहेत. त्याला औषध दुकानदारांनी विरोध दर्शविला आहे. 28 सप्टेबरला औषध विक्री दुकाने देशभरात बंद ठेवण्यात येणार आहेत. कर्नाटक विक्री दुकान संघटनातर्फे त्याला पाठिंबा दिला आहे. पण, यासंदर्भात आदेश जिल्हा संघटनेला अजून सूचना आल्या नाहीत. 

केंद्र सरकारतर्फे ई-फार्मसी व्यवस्था जारी केली जात आहे. त्याला देशभरात विरोध सुरु आहे. औषध विक्री दुकानदार त्याला आक्षेप घेण्यास सुरवात केली. प्रस्ताव मागे घेण्यासाठी औषध विक्री दुकान बंद ठेवून निषेध नोंदविला जाणार आहे. देशातील औषध विक्री दुकानाच्या निर्णयाला कर्नाटक राज्य औषध विक्री संघटनेने अजून पाठिंबा जाहीर केला नाही. नजिकच्या कालावधीत त्यावरती निर्णय घेण्यात येईल. 

ई फार्मसी व्यवस्था घाईगडबडीत जारी केली जाते आहे. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली नाही. औषध दुकान विक्रीवर याचे काय परिणाम होतील, त्याचा अभ्यास केला नाही. शिवाय फसवणुकीचे प्रकार वाढीस लागतील. त्यासाठी प्रस्ताव संदर्भात सर्वंकष अभ्यास केला जावा. त्यामुळे ई फार्मसी व्यवस्था मागे घेण्याची मागणी केली आहे. त्यासाठी औषध विक्रीचे दुकान बंद ठेवून निषेध नोंदविला जाणार आहे. 


केंद्र सरकारने "ई फार्मसी' व्यवस्था जारी करत आहे. त्याला विरोध दर्शवण्यासाठी औषध विक्री दुकाने 28 सप्टेंबरला बंद ठेवण्यात येणार आहे. पण, याबाबतचा अधिकृत आदेश आला नाही. 8 दिवस शिल्लक आहेत. या दरम्यान सूचना वा माहिती येण्याची शक्‍यता आहे.
- सुभाष कत्ती 

अध्यक्ष, जिल्हा औषध विक्री दुकान संघटना 
 

मेडिकल संघटनेतर्फे 28 रोजी मेडिकल बंद आंदोलन हाती घेतले आहे. यासाठी 27 सप्टेंबर मध्यरात्रीपासून औषध विक्री बंद असेल. 28 सप्टेंबर रोजी रात्री सेवा पूर्ववत होईल, अशी माहिती संघटनेतर्फे देण्यात आली आहे. खासगी मेडिकल सेवा बंद राहिल्यानंतर याचे परिणाम सरकारी मेडिकल्सवर पडतील. त्यासाठी पूर्वतयारी आरोग्य खात्यातर्फे सुरु आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Latest Marathi News Live Update: पुण्यातील प्रचारसभास्थळी नरेंद्र मोदी दाखल

Loksabha election 2024 : ''जेव्हा माझी पंतप्रधान पदासाठी घोषणा झाली तेव्हा मी रायगडावर आलो अन्...'' मोदींनी साताऱ्यात सांगितली आठवण

Revanth Reddy: शहांचा 'तो' व्हिडिओ शेअर करणं भोवलं! तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी दिल्लीला बोलावलं

IPL 2024, KKR vs DC Live Score: कोलकाता-दिल्ली थोड्याचवेळात येणार आमने-सामने; जाणून कोण ठरलंय आत्तापर्यंत वरचढ

SCROLL FOR NEXT