Meghalaya Elections congress Election on 27 February Vincent Pala politics sakal
देश

Meghalaya Elections : ना भव्य सभा, ना स्टार प्रचारक

मेघालय निवडणुकीसाठी काँग्रेसने बदली रणनीती

सकाळ वृत्तसेवा

शिलाँग : देशातील विविध राज्यांत पीछेहाट होत असलेल्या काँग्रेसने आगामी मेघालय विधानसभा निवडणूकीसाठी रणनीती बदलली आहे. भव्य जाहीर सभांचे आयोजन किंवा स्टार प्रचारकांना आमंत्रण असे न करता थेट मतदारांशी संवाद साधण्यावर लक्ष केंद्रित करण्यात येईल. २७ फेब्रुवारी रोजी निवडणूक होईल.

काँग्रेसचे मेघालयचे प्रदेशाध्यक्ष व्हिन्सेंट एच. पाला यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, आमचे ८० टक्के उमेदवार नवे आहेत. ते प्रथमच विधानसभेसाठी लढत आहेत. आम्ही मतदारांच्या घरांना भेटी देण्यावर आणि सामुदायिक पातळीवर छोट्या सभा आयोजित करण्यावर भर देऊ. लोकांना आपला उमेदवार कळावा हा आमचा उद्देश आहे. राज्यातील राजकीय स्थितीनुसार सर्वोत्तम पर्यायाशी आम्ही जुळवून घेऊ. पक्षावर बांधिलकी ठेवण्यापेक्षा येथील लोक उमेदवाराला जाणून घेणे पसंत करतात.

पाला हे सुत्नगा-सैपुंग मतदारसंघातून नशीब आजमावणार आहेत. स्वतः आपण मोठ्या सभा घेणार नाही असे स्पष्ट करून ते म्हणाले की, मी मतदारसंघनिहाय सभांमध्ये सहभागी होईन. आमच्या पक्षाच्या उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी आयोजित केलेल्या पक्षाच्या बैठकांना मी उपस्थित राहीन.

काँग्रेसला २०२१ मध्ये मेघालयात हादरा बसला. १७ पैकी १२ आमदारांनी तृणमूल काँग्रेसचा रस्ता धरला, तर इतर पाच जणांना पक्षविरोधी कारवायांमुळे निलंबित करण्यात आले. यानंतरही पारंपरिक मतदारांनी काँग्रेसची साथ सोडली नसल्याचा विश्वास पाला यांनी व्यक्त केला. आपल्याला तशी माहिती मिळाली असून दोन मार्च रोजी निकाल जाहीर होईल तेव्हा त्याची पुष्टी होईल, असेही त्यांनी नमूद केले.

नव्या, तरुण चेहऱ्यांमुळे विश्वास

प्रदेशाध्यक्ष पाला यांनी काँग्रेस ६० सदस्यांच्या विधानसभेत काँग्रेस ३० ते ३५ जागा जिंकेल अशा विश्वास व्यक्त केला. पक्षाने अनेक नव्या आणि तरुण चेहऱ्यांना संधी दिली आहे. मेघायलचे नेतृत्व करण्यासाठी अशा चेहऱ्यांची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT