Mehbooba Mufti Reaction On Karnataka High Court Hijab Row Judgement  Sakal
देश

'फक्त धर्माविषयी नाहीतर...', हिजाबवरील निकालानंतर मेहबूबा मुफ्ती नाराज

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : कर्नाटक उच्च न्यायालयाने हिजाब वादावर निकाल (Karnataka High Court Hijab Row Judgement) दिला आहे. शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाबबंदी योग्यच आहे, असं मत न्यायालयानं मांडलं असून याविरोधातील याचिका फेटाळल्या आहेत. त्यावरून मेहबूबा मुफ्ती (Mehbooba Mufti) यांनी नाराजी व्यक्त केली आहे. हा निर्णय निराशाजनक असल्याचं मुफ्ती म्हणाल्या.

शाळा-महाविद्यालयात हिजाब बंदी कायम ठेवण्याचा कर्नाटक उच्च न्यायालयाचा निर्णय अत्यंत निराशाजनक आहे. एकीकडे आपण महिलांच्या सक्षमीकरणाविषयी बोलतो तरीही आपण त्यांना साध्या आवडी-निवडीचा अधिकार नाकारत आहोत. हे केवळ धर्माविषयी नाही तर निवडीचे स्वातंत्र्य आहे, असं मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या.

काही दिवसांपूर्वी कर्नाटकमधील उडपी येथे हिजाब घातलेल्या विद्यार्थिनींना महाविद्यालयाने प्रवेश नाकारला होता. त्यानंतर या विद्यार्थिनींनी शिक्षण विभागाकडे तक्रार केली होती. पण, शाळा-महाविद्यालयांमध्ये गणवेशातच यावे, असं सरकारनं सांगितलं होतं. त्यानंतर विद्यार्थिनींनी न्यायालयात धाव घेतली. हिजाब वादाचं लोण हळूहळू उडपीच्या आजूबाजूच्या जिल्ह्यात देखील पसरलं होतं. मुली हिजाब घालून आल्या तर आम्ही भगवे शेले घेऊन येऊ अशा भूमिका काही हिंदूत्ववादी विद्यार्थ्यांनी घेतली होती. कर्नाटकमध्ये आंदोलन देखील करण्यात आले. भगवे शेले घातलेल्या विद्यार्थ्यांनी एका हिजाब घातलेल्या मुलीला घेराव घालून ''जय श्री राम''च्या घोषणा दिल्या होत्या, तर त्या विद्यार्थिनीनं ''अल्लाह हू अकबर'' म्हणत त्यांना उत्तर दिलं. त्यानंतर हे प्रकरण चांगलंच चिघळलं. आता न्यायालयानं निकाल दिला असून शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब बंदी योग्यच आहे, असं म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 1st T20I: कॅप्टन श्रेयस अय्यरचं वादळी शतक! भारताचा वेस्ट इंडिजवर ३२ चेंडू राखून दणदणीत विजय, मालिकेत आघाडी

MPSC Student Agitation : अध्यक्षांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम; विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची काढली प्रतीकात्मक अंत्ययात्रा

Pune Crime : कसबा मंदिरातील दानपेटी फोडली! मध्यरात्री मंदिराचे कुलूप तोडून ६० हजारांची रोकड लंपास; आरोपीला अटक

IND A vs AUS A, 1st ODI: पाटीदार लढला, पण बाकी सारे ढेपाळले; भारताचा संघ १४९ वर ऑलआऊट, ऑस्ट्रेलियाचा मोठा विजय

India New Captain: भारतीय महिला संघाला मिळाली नवी कर्णधार! BCCI ने जाहीर केले ODI अन् T20I संघ, हरमनप्रीतला मिळाली जागा?

SCROLL FOR NEXT