Mehbooba Mufti Team eSakal
देश

"दहशतवाद्यांनी केलं ते चुक आणि आर्मीनं केलेलं बरोबर कसं?"

काश्मीरमध्ये सध्या अशांतता निर्माण झाली आहे.

सुधीर काकडे

जम्मु काश्मीर मध्ये मागच्या काही दिवसांत दहशतवाद्यांनी केलेल्या कारवायांमुळे पुन्हा एकदा खोऱ्यांत अशांतता वाढल्याचं दिसतंय. जम्मू काश्मीरमधील धार्मिक तेढ निर्माण व्हावं या हेतुनं दहशतवादी जाणीवपुर्वक बीगर मुस्लीमांना लक्ष करत असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. त्यातच काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी केंद्रीय सुरक्षा दलांवर आरोप केले आहेत. यावेळी त्यांनी सीआरपीएफकडून मारल्या गेलेल्या एका भारतीय नागरिकाच्या मृत्यूवर देखी प्रश्न उपस्थित केला आहे.

अतिरेक्यांच्या गोळ्यांमुळे मरण पावलेल्या मृतांच्या नातेवाईकांना आम्ही भेटतो. मात्र अलीकडेच, सीआरपीएफने दलित समुदायाच्या व्यक्तीची गोळ्या घालून हत्या केली. जेव्हा आम्ही त्याच्या कुटुंबाला भेटायला गेलो तर घराला कुलूप लावलेले होते. कोणी आपल्या देशातील गोळीने मारला गेला तर ठिक आहे, आणि दहशतवाद्यांच्या गोळीने मेला तर चुक, ही कसली सिस्टीम आहे असा प्रश्न यावेळी मुफ्ती यांनी उपस्थित केला.

दरम्यान, दहशतावद्यांच्या विरोधात सुरु असलेल्या कारवाई दरम्यान एका कनिष्ठ आधिकाऱ्यासह चार जवान शहीद झाले आहेत. जम्मू काश्मीरमधील पुंछ भागात भारतीय लष्कराने दहशतवाद विरोधी कारवाई सुरु केली आहे. यावेळी दहशतवादी आणि भारतीय लष्करामध्ये चकमक झाली. यामध्ये एका आधिकाऱ्यासह चार जवान गंभीर जखमी झाले होते. उपचारासाठी त्यांना जवळील लष्काराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. अशी माहिती सैन्याच्या प्रवक्त्यांनी दिलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रशियन तेल खरेदी करणाऱ्यांवर अमेरिकेकडून शंभर टक्के टॅरिफ; ट्रम्प यांच्या प्लॅनवर भारताची पहिली प्रतिक्रिया

Koyna Dam: कोयना धरणाचा मध्यरात्री मोठा विसर्ग! 23,520 क्युसेक पाणी नदीत; कृष्णा-कोयना काठावरील गावांना अलर्ट

Commonwealth Games 2026: भारताची 'ज्युदो'त पदक हॅटट्रिक! LIC एजंटच्या लेकीच्या जिद्दीला सलाम; कोण आहे यामिनी मौर्य?

Leopard Attack: श्वानाच्या धाडसाने बिबट्याला पळवले! पुरंदरात कालवडीवरचा हल्ला फसला, मध्यरात्री रंगला थरार..

Cultural Heritage: मुसळधार पावसाचा सांस्कृतिक वारशाला तडा! कवयित्री शांता शेळके यांच्या ऐतिहासिक वाड्याचा भाग कोसळला

SCROLL FOR NEXT