Mehbooba Mufti Sakal
देश

'अंत पाहू नका', तालिबानचा संदर्भ देत मेहबूबांचा केंद्राला इशारा

सकाळ वृत्तसेवा

तालिबानच्या निमित्ताने जम्मू-काश्‍मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी पुन्हा केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

श्रीनगर - तालिबानच्या निमित्ताने जम्मू-काश्‍मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी पुन्हा केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ‘‘ तालिबानमुळे अमेरिकेला अफगाणिस्तान सोडावे लागले. आमच्याही सहनशीलतेचा अंत पाहू नका. ज्या दिवशी आमचा संयम सुटेल त्या दिवशी तुम्ही देखील राहणार नाहीत.’’ अशी खुली धमकीच मेहबूबा यांनी दिल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.

‘‘ काश्‍मीर खोऱ्यामध्ये पुन्हा शांतता निर्माण करायची असेल तर येथे नव्याने ३७० वे कलम येथे लागू केले जावे. चर्चेच्या माध्यमातून काश्‍मीर प्रश्‍नावर तोडगा काढण्यात यावा. तालिबान्यांमुळे अमेरिकेला अफगाणिस्तान सोडावे लागले, शेजाऱ्यांकडे पाहून केंद्र सरकारने वेळीच सावध व्हावे. सध्या जगाचे लक्ष तालिबानकडे लागले आहे. यानिमित्ताने मी देखील तालिबानी नेतृत्वाला जग तुमच्या विरोधात जाईल असे कोणतेही कृत्य करू नका असे आवाहन करत आहे.’’ असे मेहबूबा म्हणाल्या.

तर काश्‍मीर भारतात नसते

तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी १९४७ साली या राज्याचे वेगळेपण कायम ठेवण्याचे आश्‍वासन दिले होते. स्वातंत्र्याच्या वेळी भाजप जर सत्तेत असता तर आज हे राज्य भारताचा भाग राहिला नसते असेही मेहबूबा यांनी स्पष्ट केले. काश्‍मीरमधील असंतोष दडपण्यासाठी सरकार केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग करत आहे. भाजपची मंडळी सुधारली नाही तर देशाचे विभाजन अटळ आहे असेही त्या म्हणाल्या.

मेहबूबा मुफ्ती यांनी अशा प्रकारची विधाने करू नयेत. जम्मू-काश्‍मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. -निर्मला सीतारामन, अर्थमंत्री

मेहबूबा यांना काश्‍मीरमध्ये तालिबान्यांची राजवट यावी असे वाटते पण आमचे सरकार या दहशतवाद्यांचा सफाया करेल. - रवींद्र रैना, नेते भाजप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT