देश

मेहुल चोक्सीने गर्लफ्रेंडलाच दिली खोटी हिऱ्याची अंगठी

चोक्सीने राज अशी स्वत:ची ओळख करुन दिली होती.

दीनानाथ परब

नवी दिल्ली: मेहुल चोक्सीच्या (Mehul Choksi) अपहरणामध्ये माझी काही भूमिका नाहीय, असा दावा बार्बरा जाराबिकाने (Barbara Jarabica)केला आहे. बार्बरा जाराबिका पीएनबी बँक घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सीची कथित गर्लफ्रेंड आहे. "मागच्यावर्षी मी अँटिग्वाला गेले होते. त्यावेळी मेहुल चोक्सीने माझ्याशी संपर्क साधला व राज अशी स्वत:ची ओळख करुन दिली" बार्बराने इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत हा दावा केला आहे. (Mehul Choksi flirted with me gifted fake diamond rings Barbara Jarabica)

"माझी मेहुल चोक्सीबरोबर मैत्री होती. चोक्सीने राज म्हणून स्वत:ची ओळख करुन दिली होती. त्याने आधी मैत्री केली. त्यानंतर माझ्या बरोबर जवळीक साधण्याचा प्रयत्न सुरु केला. त्याने मला हिऱ्याची अंगठी आणि ब्रेसलेट दिले. पण ते बनावट निघाले" असे बार्बरा जाराबिकाने सांगितले.

"चोक्सीचे वकिल आणि कुटुंबियांनी माझे नाव यामध्ये खेचले. माझा या अपहरणाशी काहीही संबंध नाही. माझे नाव यामध्ये खेचण्यात आले आहे. मी आणि माझे कुटुंबीय तणावाखाली आहोत" असे बार्बरा जाराबिकाने सांगितले. अँटिग्वा पोलिसांना लिहिलेल्या पत्रात मेहुल चोक्सीने बार्बरा जाराबिकाच्या घरातून माझे अपहरण झाले व मला बोटीने डॉमिनिकाला नेण्यात आल्याचे म्हटले आहे. बोटीवर दोन भारतीय सुद्धा होते. त्यांनी मला अँटिग्वा बाहेर काढले, असा दावा मेहुल चोक्सीने केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT