memes gets viral on rafale pooja by RajnathSingh  
देश

#RafalePujaPolitics राफेलला पडलं 'लिंबू' महागात! सोशल मीडियावर धुमाकूळ

सकाळ डिजिटल टीम

राफेल बॉरडेव (फ्रान्स) : विजयदशमी व वायुसेनादलाच्या निमित्ताने काल (ता. 8) राफेल हे लढाऊ विमान भारतीय हवाई दलात दाखल झाले. संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी फ्रान्समध्ये जाऊन हे लढाऊ विमान स्विकारले. भारतीय परंपरेनुसार त्यांनी विमानावर ओम चिन्ह रेखाटत श्रीफळ वाहिले. तसेच चाकाखाली लिंबू ठेवले होते. उदबत्ती ओवाळत राजनाथसिंह यांनी राफेलची पूजा केली. त्यानंतर या विमानातून संरक्षणमंत्र्यांनी उड्डाण केले. 

राफेलच्या या पूजेवरूनच कालपासून राजनाथसिंह ट्रोल होत आहेत. सोशल मीडियावर या पूजेने धुमाकूळ उडवला आहे. त्यात राफेलच्या चाकाखाली लिंबू ठेवल्याचा फोटो व्हायरल झाल्यापासून या ट्रोलिंगला तर उधाण आले आहे. काल विजयादशमी निमित्त शस्त्रपूजन करतात, त्यामुळे राफेलची पूजा करणे इतपत ठिक होते, पण लढाऊ विमानाच्या चाकाखाली लिंबू ठेवणे अति होते किंवा अंद्धश्रद्धेला प्रोत्साहन दिल्यासारखे होते असे नेटकऱ्यांचे म्हणणे पडले आहे. 

राफेलच्या चाकाखाली लिंबू, राफेलवर नारळ तसेच 'ऊँ' लिहिल्याचे फोटो व्हायरल होत आहेत. यामुळे पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या नावावरून भाजप राजकारण करत आहे अशी टीका होत आहे तर, ट्विटरवर  #RafalePujaPolitics हा हॅशटॅग ट्रेंडिंग आहे. तर यालाच जोडून नेटकऱ्यांनी काही मिम्स तयार केले आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : राष्ट्रवादी अन् मविआ पुणे महापालिका निवडणूक एकत्र लढणार? अजितदादांचा सतेज पाटील यांना फोन

हृदयद्रावक! भीषण अपघातात मामा-भाचीनंतर सात महिन्यांच्या गर्भवती महिलेच्या पोटातील बाळाचाही मृत्यू; कुटुंब अक्षरशः उद्ध्वस्त

Latest Marathi News Live Update : नगराध्यक्ष होताच हातात झाडू घेऊन मैथिली तांबे उतरल्या थेट संगमनेरच्या रस्त्यावर

Kolhapur Flashback : रिक्षाचालकांचा घेराओ, सभात्याग आणि गुप्त खेळी; १९८० ची महापौर निवडणूक इतिहासजमा

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंची आमदारकी वाचली ! सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती देण्याचा आदेश

SCROLL FOR NEXT