Menstrual Leave  Sakal
देश

Menstrual Leave : वर्किंग वुमनला मासिक पाळीदरम्यान मिळणार सुट्टी?; SC ने दिलं उत्तर

याचिकेत झोमॅटो, बायजू, स्विगी यासारख्या काही भारतीय कंपन्या पेड पीरियड लीज देत असल्याचा युक्तीवाद करण्यात आला होता.

सकाळ डिजिटल टीम

Menstrual Leave : भारतातील विद्यार्थिनी आणि नोकरदार महिलांना मासिक पाळीच्या सुट्टीची मागणी करणारी जनहित याचिका (PIL) भारताच्या सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. (SC refuses to entertain PIL seeking menstrual pain leave for female students and working women)

हेही वाचा : जाणून घ्या काॅन्ट्रा फंडातल्या गुंतवणुकीबाबत

मात्र, आता ही जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारण्यास कोर्टाने नकार दिला आहे. अधिवक्ता शैलेंद्र मणी त्रिपाठी यांनी ही जनहित याचिका दाखल केली होती. ही धोरणात्मक बाब असून, याचिकाकर्त्याला सरकारकडे जाऊन त्यांच्या मागणीसह निवेदन द्यावे लागेल असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

याचिकेत मातृत्व लाभ कायदा, 1961 च्या कलम 14 चे पालन करण्यासाठी केंद्र आणि सर्व राज्यांना निर्देश देण्याची मागणी करण्यात आली होती.

याचिकेमध्ये युनायटेड किंगडम, चीन, वेल्स, जपान, तैवान, इंडोनेशिया, दक्षिण कोरिया, स्पेन आणि झांबिया यांसारखे देश महिलावर्गाला या कालावधीत कोणत्या ना कोणत्या स्वरूपात मासिक सुट्टी देत ​असल्याचेही म्हटले होते.

याचिकेत नेमकं काय?

दाखल करण्यात आलेल्या याचिकेत लंडन विद्यापीठातील एका अभ्याससाचा दाखला देण्यात आला होता. ज्यामध्ये मासिक पाळीच्यावेळी स्त्रीला होणाऱ्या वेदना या हृदयविकाराच्या झटक्यादरम्यान होणाऱ्या वेदनांच्या बरोबरीचे असतात.

अशा वेदनांमुळे काम करणाऱ्या महिलांची आणि विद्यार्थीनींच्या अभ्यासावर आणि कामावर परिणाम होत असल्याचे याचिकेत नमुद करण्यात आले होते.

याशिवाय याचिकेत झोमॅटो, बायजू, स्विगी, फ्लायमायबिझ आणि गोझूप यासारख्या काही भारतीय कंपन्या पेड पीरियड लीज देतात असा युक्तीवाद करण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT