BJP Leader
BJP Leader 
देश

Ankita Bhandari murder Case: माझं पोरगं साधं भोळं; भाजप नेत्याकडून मुलाचा बचाव

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - 19 वर्षीय रिसॉर्ट रिसेप्शनिस्ट अंकिता भंडारीच्या कथित खून प्रकरणातील प्रमुख आरोपीचे वडील आणि भाजपमधून हाकपट्टी झालेले नेते विनोद आर्य यांनी आपल्या मुलाचा बचाव केला आहे. आपला मुलगा साधा, भोळा असल्याचं त्यांनी म्हटलं. (Ankita Bhandari murder Case news in Marathi)

पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, "पुलकित बऱ्याच दिवसांपासून त्यांच्यापासून वेगळं राहत होता. निष्पक्ष तपास व्हावा यासाठी मी भाजपमधील पदाचा राजीनामा दिला आहे. शिवाय माझ्या दुसऱ्या मुलानेही ओभबीसी आयोगांच्या उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

उत्तराखंडमधील पौरी येथील एका रिसॉर्टमध्ये अंकिता भंडारी हत्येप्रकरणी नेत्याच्या दुसऱ्या मुलाला अटक करण्यात आल्यानंतर शनिवारी भाजपने विनोद आर्य आणि त्यांच्या मुलाची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. आरोपीच्या भावाला राज्य ओबीसी आयोगाच्या उपाध्यक्षपदावरूनही सरकारने हटवले आहे.

आपला मुलगा निर्दोष असल्याचा दावा करत विनोद आर्य म्हणाले, "माझा मुलगा साधा भोळा आहे. त्याला फक्त त्याच्या कामाची काळजी आहे. मला माझा मुलगा पुलकित आणि खून झालेल्या मुलीला न्याय हवा आहे. तसेच माझा मुलगा अशा कामात कधीच भाग घेणार नाही. 2016 मध्ये पुलकितवर फसवणूकीचा गुन्हा दाखल असल्याचा आरोपही त्यांनी फेटाळून लावला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi : ‘सीएए’ कोणीही हटवू शकत नाही; पंतप्रधानांची आझमगडच्या सभेत स्पष्टोक्ती,‘सप’च्या राजवटीत यूपीत गुंडगिरी

पुण्याचा चालता-बोलता इतिहास

Loksabha Election : पहिल्या चार टप्प्यांत ६६.९५ टक्के मतदान ; अधिकाधिक मतदानाचे आयोगाचे आवाहन

Mayawati : ‘इंडिया आघाडीने दुटप्पीपणा करू नये’

लक्षवेधी लढत : गांधी कुटुंबाचा बालेकिल्ला अभेद्य राहणार?

SCROLL FOR NEXT