Delhi Metro Sakal
देश

मेट्रोने मिळाला दिल्लीकरांना दिलासा

राजधानी दिल्लीतील मेट्रो रेल्वे आजपासून पूर्णक्षमतेने प्रवाशांना घेऊन धावू लागली आहे. त्यामुळे चाकरमान्यांसह दिल्लीकर प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

नवी दिल्ली - राजधानी दिल्लीतील मेट्रो (Delhi Metro) रेल्वे (Railway) आजपासून पूर्णक्षमतेने प्रवाशांना (Passenger) घेऊन धावू लागली आहे. त्यामुळे चाकरमान्यांसह दिल्लीकर प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. (Metro Brings Relief to Delhiites)

कोरोनाचा संसर्ग घटल्याने आता दिल्ली पूर्वपदावर येऊ लागली आहे. दिल्ली सरकारने अनलॉकची प्रक्रिया सुरू करीत आजपासून मेट्रो पूर्णक्षमतेने प्रवाशांना प्रवेश देण्यास मुभा दिली आहे. गेल्या सात जूनपासून केवळ ५० टक्के प्रवासी क्षमतेसह परवानगी दिली होती. आता मेट्रो शंभर टक्के प्रवासी क्षमतेसह धावण्यास सुरवात झाली आहे.

दिल्लीत कोरोनामुळे मेट्रो वाहतुकीवरही निर्बंध आले होते. मेट्रोचे अनेक प्रवेशद्वार बंद ठेऊन प्रवाशांना एकाच प्रवेशद्वारातून प्रवेश दिला जात होता. परंतु पूर्णक्षमतेने मेट्रो धावू लागल्याने बंद केलेली प्रवेशद्वारे खुली करण्यात आली आहे. यामुळे एकाच मेट्रो स्थानकावर प्रवाशांना इतर द्वारांमधून प्रवेश करता येणार आहे. हा देखील प्रवाशांना मोठा‌ दिलासा आहे. मेट्रो स्थानकांवर प्रवेश करण्यासाठी नागरिकांना रस्ता ओलांडावा लागणार नाही. मेट्रो पूर्ण प्रवासी क्षमतेसह धावणार असली, तरी प्रवाशांना उभे राहून प्रवास करण्यास मुभा दिलेली नाही. मात्र ५० टक्के प्रवासी क्षमतेसह मेट्रोला परवानगी असतानाही असंख्य प्रवासी उभे राहून प्रवास करताना दिसत होते. ते चित्र आजही कायम आहे.

भूकंपाचा सौम्य धक्का

राजधानी पावसाच्या प्रतिक्षेत असतानाच आज सकाळी पावणेसात वाजता दिल्लीस भूकंपाचा सौम्य धक्का बसला. त्यामुळे काही काळ मेट्रोचा वाहतूक रोखण्यात आली होती. याकाळात अनेक स्थानकाबाहेर प्रवाशांच्या रांगा लागल्या होत्या. नंतर वाहतूक सुरळीत झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिन अहिर यांची बिनविरोध निवड, विरोधकांनी अर्ज का मागे घेतला? सभागृहात काय घडलं?

Mumbai Local: प्रवाशांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर? मुंबई लोकलमध्ये आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांचा तुटवडा; २,५५९ पदे रिक्त

Raj Thackeray: "ते देहविक्रीलाही तयार असतील तर..."; फुटीर लोकप्रतिनिधींवर राज ठाकरेंची टीका, अमित शाहांवर गंभीर आरोप

Sanjay Raut Statement : संजय राऊत म्हणाले 'आम्हाला आत्मचिंतनाची गरज आहे'; मूळ शिवसैनिकांवरच पक्ष उभा राहतो

Hardik Pandya Trade: हार्दिकसाठी CSKसह एकूण ७ फ्रँचायझींमध्ये चुरस; दोनच संघ ज्यांना Mumbai Indians च्या कर्णधारामध्ये नाही रस

SCROLL FOR NEXT