Mia Khalifa picture on hoarding 
देश

Mia Khalifa: मंदिरात पार्वती मातेची पूजा अन् बाहेर होर्डिंगवर पॉर्न स्टार मिया खलीफाचा फोटो, वादाला फुटले तोंड

Mia Khalifa picture on hoarding religious: धार्मिक उत्सवाच्या दरम्यान लावण्यात आलेल्या एका होर्डिंगमुळे वाद निर्माण झाला आहे. तामिळनाडूच्या कांचीपुरम येथे धार्मिक कार्यक्रमावेळी होर्डिंगवर चक्क माजी पॉर्न स्टार मिया खलीफाचा फोटो लावण्यात आला आहे.

कार्तिक पुजारी

चेन्नई- तमिळनाडूमध्ये सध्या धार्मिक वातावरण आहे. राज्यात सध्या आदी उत्सव सुरु आहे. या काळात तामिळनाडूच्या मंदिरात देवी अम्मानची ( पार्वती) पूजा केली जाते. असे असताना धार्मिक उत्सवाच्या दरम्यान लावण्यात आलेल्या एका होर्डिंगमुळे वाद निर्माण झाला आहे. तामिळनाडूच्या कांचीपुरम येथे धार्मिक कार्यक्रमावेळी होर्डिंगवर चक्क माजी पॉर्न स्टार मिया खलीफाचा फोटो लावण्यात आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

इंडिया टूडेने यासंदर्भातील रिपोर्ट दिला आहे. कुरुविमलाईमध्ये नागथम्मन आणि सेलियाम्मन मंदिरात कार्यक्रम सुरु आहे. याची सजावट करण्यासाठी लायटिंग आणि होर्डिंग लावण्यात आले होते. यावेळी एक आश्चर्यकारण प्रकार पाहायला मिळाला. होर्डिंगवर देवदेवतांसोबत मिया खलीफाचा देखील फोटो लावण्यात आला आहे. त्यामुळे वादाला तोंड फुटलं आहे.

देवीच्या मंदिराबाहेर लावण्यात आलेल्या होर्डिंगवर आधार कार्डच्या फॉर्मेटमध्ये इतर काही लोकांचे फोटो लावण्यात आले आहेत. सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी आले होते. त्यांनी पोस्टर हटवले आहेत. या संदर्भातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत होते. पोलिसांपर्यंत ते पोहोचल्यानंतर कारवाई करण्यात आली आहे.

होर्डिंगवर माता पार्वतीच्या बाजूलाच मिया खलीफाचा फोटो लावण्यात आला होता. त्यामुळे लोकांनी संताप व्यक्त केला होता. होर्डिंगवर मिया खलीफाचा फोटो कोणी लावला हे समजू शकलेलं नाही. पोलीस पुढील तपास करत आहेत. दरम्यान, मिया खलीफा ही प्रसिद्ध पॉर्न स्टार आहे. ती अमेरिकेची नागरिक आहे. काही महिन्यांपूर्वी तिने पॉर्न इंडस्ट्रित यापुढे काम करणार नसल्याचं जाहीर केलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: जरांगेंचं उपोषण सुरु असताना नाशिकमध्ये मराठा समन्वयकांची पत्रकार परिषद; SEBC आरक्षणावर ठाम!

करोडपती सासऱ्याने असं काय केलं की ३० वर्षीय सुनेनं थेट रचला कट, ६ लाखांची सुपारी देत संपवलं; धक्कादायक माहिती उघड

Nagara Road Accident : कामाच्या शोधात निघालेल्या मजुरांवर काळाचा घाला! गोंदिया-बालाघाट मार्गावर ट्रक-पीकअपच्या धडकेत 6 जण ठार, 3 वर्षीय बालकाचाही समावेश; 7 गंभीर

Marathi News Live Updates : काल केसनंद, आज खराडी... ऐश्वर्या जाधव यांच्या लावणी कार्यक्रमाला पुन्हा परवानगी नाकारली!

२८ चेंडूंत १३६ धावा! Mumbai Indians च्या फलंदाजाची हवा; १७३ धावांच्या वादळी खेळीने वेधले जगाचे लक्ष, IPL 2027 गाजवण्यासाठी सज्ज

SCROLL FOR NEXT