मुंबई: पंजाबच्या मोगा जिल्ह्यात गुरुवारी रात्री मिग-२१ बायसन (MiG-21 crash)फायटर विमान कोसळलं. या अपघातात स्क्वॉड्रन लीडर अभिनव चौधरी शहीद झाले. अभिनव चौधरी (Abhinav Chaudhary) मूळचे मेरठचे. शुक्रवारी सकाळी त्यांच्या मेरठ येथील निवासस्थानी कुटुंबीयांचं सांत्वन करण्यासाठी पाहुणे मंडळ, मित्र परिवार लोटला होता. यावेळी अभिनव यांचे वडिल सत्येंद्र चौधरी यांनी मुलाचं टी-शर्ट परिधान केलं होतं. पेशाने शेतकरी असलेल्या सत्येंद्र चौधरी यांचे पाणावलेले डोळेच सर्वकाही सांगून जात होते. (MiG-21 crash Discontinue obsolete jets dont want others to lose their sons dead pilot Abhinav Chaudharys Father)
मुलगा गेल्याचं दु:ख कधीही भरुन निघणार नाही, हे त्यांच्या शब्दांमधुन कळतं होतं. 'मी आज सर्वकाही गमावून बसलोय' ही त्यांची प्रतिक्रियाचं सर्वकाही सांगून गेली. त्यांना मुलाचा अभिमान वाटत होता, त्याचवेळी ते व्याकुळ आणि संतप्तही होते.
"जुन्या, जीर्ण झालेल्या मिग-२१ विमानांचा वापर थांबवा. सरकारने जुन्या झालेल्या या विमानांचा वापर बंद केला पाहिजे. मी माझा मुलगा गमावला आहे. माझ्यासारखा प्रसंग दुसऱ्या कोणावर ओढवू नये, अशी माझी इच्छा आहे. मी सरकारला हात जोडून विनंती करतो की, त्यांनी मिग-२१ फायटर विमानांचा वापर बंद करावा" असे सत्येंद्र चौधरी म्हणाले. अभिनव चौधरी यांच्या पश्चात आई-वडिल, बहिण आणि पत्नी असा परिवार आहे. डिसेंबर २०१९ मध्ये अभिनव यांचे लग्न झाले होते. ते १५ मे रोजी सुट्टी घेऊन घरी येणार होते. पण पालकांनीच त्यांना कोरोनाच्या साथीमुळे तिथे थांबण्यास सांगितले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.