Mig-21-Crashed-Madhya-Pradesh 
देश

मध्य प्रदेश : हवाई दलाचे 'मिग 21' कोसळले; दोन्ही पायलट सुखरूप

वृत्तसंस्था

भिंड/ग्वाल्हेर : भारतीय हवाई दल (आयएएफ) हे अनेक अत्याधुनिक लढाऊ विमानांनी सुसज्ज आहे. मिग, सुखोई, मिराग, तेजस, बोईंग, जॅग्वार यांचा समावेश आयएएफच्या ताफ्यात आहे. मात्र, मिग-21 चे अपघात होण्याचे प्रकार वारंवार घडत असल्याचे आपण पाहतो. 

भारतीय हवाई दलाचे 'मिग 21' हे प्रशिक्षणासाठी वापरण्यात येणारे विमान मध्य प्रदेशमधील भिंड जिल्ह्यात कोसळले. दोन्ही वैमानिक विमानातून सुखरूप बाहेर पडले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

'मिग 21' या विमानाने नेहमीच्या प्रशिक्षणासाठी बुधवारी (ता.25) सकाळी दहा वाजता हवाई दलाच्या ग्वाल्हेर तळावरून उड्‌डाण केले होते. धावपट्टीवर उतरण्याआधी 6 नॉटिकल अंतरावर असताना विमान कोसळले. यानंतर विमानाला आग लागली, पण सुदैवाने दोन्ही वैमानिक यातून सुखरूप बाहेर पडले.

हवाई दलाचे मदत पथक हेलिकॉप्टरने तातडीने घटनास्थळी पोचल्यानंतर वैमानिकांना तेथून हलविण्यात आले. अपघाताची कारणे शोधण्यासाठी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत, असे हवाई दलातर्फे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi : सोने आणि पेट्रोलबाबतच्या आवाहनाचा परिणाम दिसतोय,लोक प्रतिसाद देताहेत; पंतप्रधान मोदींनी 'मन की बात'मध्ये सांगितले अनेक अनुभव

FIFA World Cup 2026: 52 वर्षांची प्रतीक्षा संपली! World Cup मध्ये काँगोने रचला इतिहास; आता थेट इंग्लंडशी भिडणार

Amazon Prime Day 2026 : अर्ध्या किंमतीत मिळतायत 'हे' 5 प्रीमियम मोबाईल; सेल येण्याआधीच डील्स झाल्या लिक

Latest Marathi News Update : पल्स पोलिओ लसीकरणाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते

Marathi Book Review : वाचनप्रेमींसाठी चार नवी पुस्तके; प्रवास, कथा आणि अध्यात्माचा अनोखा संगम

SCROLL FOR NEXT