MiG-29K jets to move to air bases in North amid India-China border row 
देश

भारत-चीन तणावाची स्थिती कायम; महत्वाच्या तळावर फायटर विमाने तैनात

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : भारत-चीन तणाव काही केल्या निवळताना दिसत नाही. पूर्व लडाखमध्ये अजूनही तणावाची स्थिती कायम आहे. त्यामुळे भारतीय नौदलाकडून उत्तरेकडील इंडियन एअर फोर्सच्या महत्त्वाच्या तळांवर मिग-२९के फायटर विमानांची तैनाती सुरु आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

ही मिग-२९ के विमाने मूळ रशियन बनावटीची आहेत. गोव्यातील नौदलाच्या बेसवरुन काही विमाने उत्तरेकडील इंडियन एअर फोर्सच्या तळावर हलवली आहेत. चीन सीमेवरील स्थितीचा आढावा घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले आहे. चीन विरोधात लष्करी स्थिती बळकट करण्यासाठी आएएफने उत्तरेच्या बेसवरुन अनेक फायटर विमाने लडाखमध्ये तैनात केली आहेत. नौदलाच्या फायटर विमानांचा वापर नेमका कशासाठी करणार? ते अजून स्पष्ट झालेले नाही. विमाने आणि वैमानिक उपलब्ध असतील, तर त्याचा वापर का करु नये? असे निवृत्त नौदल अधिकारी डी. के. शर्मा म्हणाले आहेत.

भारतीय नौदलाच्या ताफ्यात सध्या ४० पेक्षा जास्त मिग-२९के विमाने आहेत. त्यात १८ विमाने आयएनएस विक्रमादित्य या एकमेव विमानवाहू युद्धनौकेवर तैनात आहेत. उर्वरित मिग-२९ के विमाने गोवा येथील नौदलाच्या बेसवर असतात. सध्या लडाखमध्ये नौदलाच्या P-8I विमानाचा वापर सुरु आहे. P-8I या विमानांमध्ये लांब अंतरावरुन शत्रुच्या पाणबुडीचा अचूक वेध घेण्याची, टेहळणीची आणि इलेक्ट्रॉनिक जॅमिंगची क्षमता आहे. लडाखमध्ये नियंत्रण रेषेजवळ चीनच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी या विमानाचा वापर होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: आधी शमीने धक्के दिले अन् मग नितीश रेड्डी-क्लासेनने LSG च्या गोलंदाजांना फोडलं; SRH चा १५० धावांचा टप्पा पार

२० वर्षीय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरनं हाताची नस कापली, मनगटावर १८ वेळा वार; का उचललं टोकाचं पाऊल

Pune Crime: पुण्यात १७ वर्षीय तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल, २१ वर्षीय तरुणानं फोटो व्हायरल करण्याची दिली होती धमकी!

Jawkheda Thombre farm fire: जवखेडा ठोंबरे येथे शेतकऱ्याच्या शेडला भीषण आग; ज्वारी कडबा, भुस व औजारे जळून सुमारे ३ लाखांचे नुकसान

Latur sandalwood smuggling news: लोहा-चाकूर परिसरात भाजीपाल्याच्या कॅरेटमध्ये लपवलेले ३६.७५ लाखांचे चंदन जप्त; तिघांना अटक, ५१.९६ लाखांचा मुद्देमाल ताब्यात

SCROLL FOR NEXT