army/Police File Photo
देश

जम्मू-काश्मीर : पुलवामात पोलिसांवर दहशतवादी हल्ला; सात जखमी

जखमींना तातडीनं जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

Amit Ujagare (अमित उजागरे)

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी एका पोलीस पार्टीवर ग्रेनेट हल्ला केल्याचं वृत्त आहे. या हल्ल्यात सात नागरिक जखमी झाले असून त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पुलवामा जिल्ह्यातील त्राल येथील मुख्य बस स्थानकाजवळ ही घटना घडली. डीडी न्यूजने याबाबत वृत्त दिलं आहे. (Militants hurl grenade at police party in J&K Pulwama seven injured)

डीडीच्या वृत्तानुसार, या हल्ल्यात किरकोळ जखमी झालेल्या सात नागरिकांना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. या हल्ल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी घटनास्थळाजवळील संपूर्ण भागात नाकाबंदी केली आहे.

दरम्यान, अशाच पद्धतीचा हल्ला दहशतवाद्यांनी २६ मे रोजी त्राल भागातचं केला होता. यावेळी दहशतवाद्यांनी सीआरपीएफ जवानांच्या दिशेने ग्रनेड फेकले होते. या हल्ल्यात कोणालाही इजा किंवा जीवितहानी झाली नव्हती. तसेच याच वर्षी १२ मे रोजी जम्मू-काश्मीरच्या सांबा क्षेत्रात संशयीत दहशतवाद्यांनी पोलीस पार्टीवर ग्रेनेड फेकले होते. हा हल्ला झाला त्यावेळी पोलीस सांबा-उधमपूर मार्गावर वाहनांची तपासणी करत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News: नागपूरला विकासाची नवी गती मिळणार, तिसरा रिंगरोड मल्टीमॉडल कॉरिडॉर बनणार; मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा

Police Commemoration Day : पोलिस स्मृतीदिनानिमित्त पुण्यात हुतात्म्यांना आदरांजली, उपमुख्यमंत्र्यांनी अर्पण केले पुष्पचक्र

अहान पांडे-शर्वरी वाघच्या चित्रपटाचं शूटिंग यूकेमध्ये, अ‍ॅक्शन आणि रोमांसचा परिपूर्ण संगम

Fake Medicine : औषध भेसळ प्रकरण; दोषी कंपन्यांवर कारवाईची मागणी, विक्रेत्यांना त्रास नको

Mira Road Clash : मीरारोडमध्ये दोन गटात तुफान हाणामारी; २० रिक्षांची केली तोडफोड, मुलीच्या छेडछाडीवरून झाला वाद

SCROLL FOR NEXT