Amit Shah-Narendra Modi esakal
देश

'मोदींच्या नेतृत्वात पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचा खात्मा'

सकाळ डिजिटल टीम

'यापूर्वीही देशात मंत्रिमंडळ होतं. मात्र, मोदींसारखं नेतृत्व कोणीच केलं नाही.'

नवी दिल्ली : गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) नेतृत्वाचं कौतुक केलंय. कोरोना महामारी (Coronavirus), दहशतवाद, नक्षलवाद आणि जम्मू-काश्मीर (Jammu and Kashmir) अशा विविध मुद्द्यांवर पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात भाजप सरकारनं केलेली कामगिरी नक्कीच कौतुकास्पद आहे, असं त्यांनी म्हंटलंय.

ते पुढे म्हणाले, 2014 पूर्वी भारतात वेगळी परिस्थिती होती. मात्र, ती आता सुधारलीय. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली कोविड महामारीच्या काळात महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले, त्यामुळं भारताची अर्थव्यवस्था सध्या इतर कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेपेक्षा वेगाने वाढतेय. एका वृत्त वाहिनीच्या कार्यक्रमात अमित शहा पुढे म्हणाले, आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सैन्यानं पाकिस्तानच्या घरात घुसून दहशतवादी हल्लेखोरांना चोख प्रत्युत्तर दिलंय. काश्मीरचा विकास खुंटला होता, त्यामुळं कलम 370 ही पंतप्रधानांनी 5 ऑगस्ट 2019 रोजी हटवलं. आता काश्मीरमध्ये शांतता आहे. विकासही जोमानं होत आहे.

पंतप्रधान मोदींनी आधी गुजरातचं नेतृत्व केलं आणि आता ते संपूर्ण देशाचं नेतृत्व करत आहेत, याचा आम्हाला अभिमान आहे. पंतप्रधान मोदींच्या आगमनानंतर जनतेला विकासाशी जोडण्याचं काम सुरू झालंय. कोरोना महामारीनं संपूर्ण जगात अनेक बदल घडवून आणले. भारतातही बरेच बदल पहायला मिळाले. देशाला आता स्थिर सरकार मिळालंय, ही आपल्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. यापूर्वीही देशात मंत्रिमंडळ होतं. मात्र, मोदींसारखं नेतृत्व कोणीच केलं नाही. देशात भ्रष्टाचार वाढला होता, देशाची बदनामी झाली होती. पण, 2014 मध्ये भारताला एक स्थिर सरकार मिळालंय, असंही त्यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : निलेश घायवळच्या अडचणी वाढणार? आणखी एक गुन्हा दाखल होण्याची शक्यता...

Nanded Dasara: नांदेडमध्ये दसरा महोत्सव उत्साहात; हल्ला-महल्ला मिरवणुकीत हजारो शीख भाविकांचा सहभाग

Pune Crime : टीव्ही बंद करायला सांगितला म्हणून केली वडिलांची हत्या; ऐन सणाच्या दिवशी घडलेल्या घटनेने कोथरुड मध्ये खळबळ

Teacher Recruitment: मराठवाड्यात शिक्षकांसाठी सुवर्णसंधी! ४५७ समन्वयक पदांसाठी ऑनलाइन परीक्षा १ ते ५ डिसेंबर

लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट; आता E-kyc केलेल्या बहिणींनाच मिळणार लाभ, दिवाळीतील हप्ता पडणार लांबणीवर

SCROLL FOR NEXT