anurag thakur 
देश

Video: केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर बनले 'कॅप्टन'; टेरिटोरियल आर्मीत मंत्र्याला पहिल्यांदाच मिळालं पद

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली

केंद्रीय अर्थराज्य मंत्री आणि भाजपा खासदार अनुराग ठाकूर टेरिटोरियल आर्मीमध्ये कॅप्टन बनले आहेत. २०१६ मध्ये टेरिटोरियल आर्मीमध्ये लेफ्टनंट झालेल्या ठाकूर यांना आता कॅप्टनपदाचा बहुमान देण्यात आला आहे. अनुराग ठाकूर असे पहिले खासदार आणि मंत्री आहेत ज्यांना हा बहुमान मिळाला आहे. 

माजी लष्करप्रमुख जनरल सुहाग यांनी २०१६ मध्ये अनुराग ठाकूर यांना टेरिटोरियल आर्मीमध्ये सामावून घेतलं होतं. भाजपपासून संसदेपर्यंत आणि क्रिकेटच्या राजकारणापासून भाजपच्या स्टार प्रचारकापर्यंत आपला ठसा उमटवणारे अनुराग ठाकूर हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री प्रेमकुमार धूमल यांचे पुत्र आहेत. भाजपच्या तरुण पिढीतील ते एक महत्वाचे नेते आहेत. 

भाजपच्या राजकारणातच नव्हे तर क्रिकेटच्या राजकारणातही अनुराग ठाकूर महत्वाची भूमिका बजावत आहेत. मे २०१६ ते फेब्रुवारी २०१७ पर्यंत त्यांनी बीसीसीआयचे अध्यक्षपद भूषवले आहे. मात्र, एक खेळाडू म्हणून त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमधील एकच सामना खेळला आहे. त्यातही ते शून्यावर आऊट झाले होते. तरीही हिमाचल प्रदेशच्या राज्य क्रिकेट संघाचे ते सर्वात कमी वयाचे अध्यक्ष बनले नाहीत तर २००१ मध्ये २६ वर्षांच्या वयातच ते सर्वात तरुण राष्ट्रीय निवड समितीत सदस्यही बनले. भाजपमध्ये देखील त्यांच्यावर महत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अनुराग ठाकूर हे भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्षही राहिले आहेत. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Belagaum House Fire : बेळगाव हादरले! गणेशोत्सवाच्या रात्री काळाचा घाला; घरातील आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू

Mumbai-Konkan Ro-Ro Service : कोकणवासियांसाठी खूशखबर! मुंबई ते वेंगुर्ला रो-रो सेवा पुन्हा सुरू होणार, प्रवासाचा वेळ वाचणार, तिकीट दरही आवाक्यात?

India Nepal Power Supply : भारत नेपाळला दररोज १८ तास वीज पुरवणार, जलप्रलयानंतर मदतीचा हात

Latest Marathi News Update : दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंचे नाव, संजय राऊत काय म्हणाले

Petrol-Diesel Price : कच्च्या तेलाच्या भावात मोठी वाढ! हैदराबादमध्ये पेट्रोल 116 रुपयांवर; महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल-CNG किती?

SCROLL FOR NEXT