देश

Modi Cabinet: केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू नंतर राज्यमंत्रीसुद्धा बदलले, कायदा मंत्रालयात मोठे फेरबदल

रुपेश नामदास

केंद्रीय मंत्रिमंडळात गुरुवारी अचानक फेरबदल करण्यात आले. आधी किरेन रिजिजू आणि आता कायदा राज्यमंत्री एसपी सिंह बघेल यांचे राज्यमंत्री पद बदलण्यात आले आहे.

एसपी सिंह बघेल यांना आता आरोग्य मंत्रालयात राज्यमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. अर्जुन राम मेघवाल यांची कायदा मंत्रालयात स्वतंत्र कार्यभार असलेले राज्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आल्याने एसपी सिंह बघेल यांची बदली करण्यात आली आहे.

अर्जुन राम मेघवाल आता संसदीय कामकाज राज्यमंत्री आणि सांस्कृतिक राज्यमंत्री आहेत. मेघवाल यांना त्यांच्या खात्यांव्यतिरिक्त कायदा आणि न्याय मंत्रालयात राज्यमंत्री म्हणून स्वतंत्र कार्यभार सोपवण्यात आला आहे.

राष्ट्रपती भवनाने जारी केलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी एसपी सिंह बघेल यांची कायदा आणि न्याय राज्यमंत्री पदावरून आता आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयात राज्यमंत्री म्हणून नियुक्ती केली आहे.

रिजिजू यांच्याकडे भूविज्ञान मंत्रालयाची जबाबदारी आली

किरेन रिजीजू यांच्या जागी संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांना कायदा मंत्री बनवण्यात आले होते. रिजिजू आता भूविज्ञान मंत्रालयाचा पदभार स्वीकारणार आहेत.

न्यायालयीन नियुक्त्यांवरून सर्वोच्च न्यायालयाशी वाद घालणारे रिजिजू 7 जुलै 2021 रोजी कायदा मंत्री झाले. त्यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांच्या राजीनाम्यानंतर क्रीडामंत्री आणि अल्पसंख्याक राज्यमंत्री रिजिजू यांना ही जबाबदारी मिळाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT