Vaccination 
देश

फ्री लशींमुळे पेट्रोल महागलं, पेट्रोलियम मंत्र्याचं स्पष्टीकरण

भाजपच्या केंद्रीय मंत्र्याने इंधन दरवाढीबद्दल अजब स्पष्टीकरण दिलंय.

ओमकार वाबळे

देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे भाव गगनाला भिडलेले असताना इंधन दरवाढीबद्दल केंद्र सरकारच्या एका मंत्र्याने अजब स्पष्टीकरण दिलं आहे. दिवसेंदिवस देशातील पेट्रोल आणि डिझेलचे दर सर्वसामान्यांची चिंता वाढवत आहेत. अशातच केंद्रीय पेट्रोलियम मंत्री रामेश्वर तेली यांचा पाय मोफत लसीकरणावर घसरला आहे.

देशभरात मोफत लसीकरण असल्याने पेट्रोल डिझेलचे भाव वाढल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलंय. तेली हे पेट्रोलियम, नैसर्गिक वायू आणि श्रम-रोजगार खात्याचे राज्यामंत्री म्हणून कार्यभार सांभाळतात. नव्याने विस्तारलेल्या नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात त्यांच्याकडे या खात्यांचा पदभार देण्यात आला आहे.

सध्या राजधानी दिल्लीत पेट्रोल 104.44 रुपये लिटर तर डिझेलचा दर 93.17 रुपये प्रति लिटर होता. मुंबईत पेट्रोल 110.41 रुपये प्रति लिटर आणि डिझेल खरेदीसाठी एका लिटरला 101.03 रुपये मोजावे लागत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT