Minister Satish Jarkiholi esakal
देश

'मला वाटते 2028 पर्यंत मी मुख्यमंत्री व्हावे'; सार्वजनिक बांधकाममंत्री म्हणाले, माझ्या मुलीलाही असंच..

Minister Satish Jarkiholi : सिद्धरामय्या (CM Siddaramaiah) यांना मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याबाबत कोणतीही चर्चा केलेली नाही.

सकाळ डिजिटल टीम

''मला वाटले २०२८ पर्यंत मी मुख्यमंत्री व्हावे. माझी कन्या खासदार प्रियंका जारकीहोळी यांनीही असेच मत व्यक्त केले. २०२८ पर्यंत वाट पाहू.''

बंगळूर : सिद्धरामय्या (CM Siddaramaiah) यांना मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याबाबत कोणतीही चर्चा केलेली नाही. मुख्यमंत्री बदल ही केवळ चर्चाच आहे, असे सांगून आपण २०२८ मध्ये मुख्यमंत्री होण्याची अपेक्षा बाळगून आहोत, असे सार्वजनिक बांधकाममंत्री सतीश जारकीहोळी (Satish Jarkiholi) यांनी स्पष्ट केले.

हासन येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ‘‘माझ्या अनेक शुभचिंतकांनी मी पुढचा मुख्यमंत्री असल्याचे सांगितले आहे. मी एवढी चर्चा करणार नाही. सिद्धरामय्या यांचा कार्यकाळ संपल्यानंतरच मी मुख्यमंत्री होईन. सिद्धरामय्या यांच्या सहकार्यानेच मुख्यमंत्री होणार आहे. मुख्यमंत्री बदलाबाबत पक्षात कोणतीही चर्चा झाली नाही. त्यामुळे सिद्धरामय्या यांच्या बदलाचा प्रश्नच उद्‍भवत नाही. मला वाटले २०२८ पर्यंत मी मुख्यमंत्री व्हावे. माझी कन्या खासदार प्रियंका जारकीहोळी यांनीही असेच मत व्यक्त केले. २०२८ पर्यंत वाट पाहू.’’

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना बदलणार नसल्याचे काँग्रेस हायकमांडने स्पष्ट केले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री बदलाचा मुद्दा हा केवळ अट्टाहास असून सिद्धरामय्या पाच वर्षे मुख्यमंत्रिपदी कायम राहतील. सिद्धरामय्या यांनी राजीनामा द्यावा, असे विधानसभेचे माजी अध्यक्ष के. पी. कोळीवाड जे बोलले, ते त्यांचे वैयक्तिक म्हणणे आहे, असे ते म्हणाले. जात जनगणनेचा मुद्दा अद्याप मंत्रिमंडळात चर्चेसाठी आलेला नाही. हे प्रकरण मंत्रिमंडळासमोर आल्यानंतर त्यावर बोलू. राज्यात अंतर्गत आरक्षण लागू करावे, असे आश्वासन काँग्रेसने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात दिले आहे. ती पूर्ण करण्यासाठी काँग्रेस प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पाच वर्षे सिद्धरामय्याच - परमेश्वर

मुख्यमंत्री बदलाबाबत आम्ही कधीही चर्चा केलेली नाही, असे गृहमंत्री डॉ. परमेश्वर म्हणाले. मंत्री सतीश जारकीहोळी किंवा डॉ. एच. सी. महादेवाप्पा यांनी कधीही चर्चा केलेली नाही. सिद्धरामय्या पाच वर्षे मुख्यमंत्री राहतील, असे आपण अनेकदा सांगितले आहे. याशिवाय मुख्यमंत्री बदलाबाबत आपण काहीही बोललो नाही. आम्हाला मुख्यमंत्री करा, असे विधान त्यांनी केलेले नाही, असेही ते म्हणाले. हायकमांडच्या सूचनेनुसार यापुढे मुख्यमंत्रिपदाच्या विषयावर प्रतिक्रिया देणार नसल्याचे ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Politics: मतांसाठी उमेदवार घासत आहेत भांडी; पश्‍चिम बंगालमध्‍ये नवा फंडा; सभांपेक्षा मतदारांशी ‘जवळीक’ महत्त्वाची..

Registrar Dairy Department Transferred : रात्रीतून सुत्रे फिरली गोकुळच्या राजकारणाला नवे वळण, थेट दुग्ध विभागाच्या निबंधकांची उचलबांगडी; सभासद नोंदणी वाद भोवला

Vidhan Parishad Election: विधान परिषदेसाठी भाजपमध्ये 'ही' नावे चर्चेत, आमदारकीसाठी 'फिल्डिंग' लावायला सुरुवात, कुणाला मिळणार संधी?

India Petrochemical Duty Exemption : सरकारचा मोठा निर्णय ! ४० प्रमुख पेट्रोकेमिकल्सवरील आयात शुल्कात सूट,'या' उद्योगांना दिलासा

Latest Marathi News Live Update : शिर्डीत हनुमान जयंतीला ताकदीचा जल्लोष! 125 किलो गोटा उचलण्याच्या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

SCROLL FOR NEXT