minister tej pratap yadav 
देश

Video : मंत्री तेजप्रताप यादव यांना राग अनावर! पक्षाच्या कार्यकर्त्याचा गळा धरत केली धक्काबुक्की

रवींद्र देशमुख

नवी दिल्ली - बिहार सरकारमधील पर्यावरण आणि वनमंत्री तथा राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजप्रताप यादव यांनी आपल्याच पक्षातील कार्यकर्त्याला धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. संतापलेल्या तेजप्रताप यांनी राजद कार्यकर्त्याचा गळा आवळला होता.

व्हायरल झालेला हा व्हिडिओ 22 ऑगस्टचा असल्याचं सांगितलं जात आहे. तेजप्रताप यादव हे आपले आई-वडील राबडी देवी आणि लालूप्रसाद यादव यांच्यासमवेत गोपालगंजच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर होते. लालूप्रसाद यादव अनेक वर्षांनंतर आपली सासरवाडी सेलार कलेत दाखल झाले. येथे पोहोचताच लालू, राबडी आणि तेजप्रताप यादव यांच्या स्वागतासाठी शेकडो लोक उपस्थित होते.

लालूप्रसाद यादव-राबडी देवी यांच्यासोबत घरात प्रवेश करत असताना धक्काबुक्कीची घटना घडली. दरम्यान, तेजप्रताप यादव यांनी पांढरा शर्ट घातलेल्या व्यक्तीची कॉलर पकडून त्याचा गळा दाबून धक्का बुक्की केली. यावेळी तेजप्रताप प्रचंड संतापलेले दिसले.

सुमंत यादव असे धक्काबुक्की झालेल्या तरुणाचे नाव असून तो राजदचा कार्यकर्ता आहे. तेजप्रताप यांनी त्याला धक्का का दिला हे अद्याप समजू शकलेले नाही. सुमंत यादव यांनी तेजप्रताप यांना सलाम केला. यावर तेजप्रताप संतापले आणि त्यांनी सुमंत यादव यांचा गळा दाबून त्यांना धक्काबुक्की केल्याचं सांगण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : नसरापूर प्रकरणातील निकाल काही क्षणांत.. कोर्टात काय घडतंय? वाचा सर्व अपडेट्स

Palghar: पालघर बनणार चौथी मुंबई ! गेमचेंजर प्रकल्पांना गती येणार, कधी पूर्ण होणार? मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

Malware Alert : लॅपटॉप-कॉम्प्युटरवर WhatsApp वापरताय? CERT-In ने दिला गंभीर इशारा, 'हा' मेसेज बघताच बँक अकाउंट होईल रिकामं

Nasrapur Case Verdict : नसरापूर हत्याप्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला फाशी की जन्मठेप? आज न्यायालयाचा अंतिम निकाल

Shaktipeeth Highway : अदानी-अंबानींसाठी सुपीक जमीन जाणार? 'शक्तिपीठ' महामार्गावरून सांगलीतील शेतकऱ्यांचा एल्गार, जिल्हा परिषदेवर वाढला दबाव

SCROLL FOR NEXT