Vistara-Airlines 
देश

देशांतर्गत विमान प्रवास महागणार?; सरकारच्या 'या' निर्णयाचा होणार परिणाम

कोविडच्या काळात नागरी उड्डाण मंत्रालयानं विमान भाड्याबाबत महत्वाचा निर्णय घेतला होता.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : देशांतर्गत विमान प्रवास आता महागण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या एका निर्णयाचा परिणाम म्हणून विमान प्रवासाची भाडेवाढ होऊ शकते. नागरी उड्डाण मंत्रालयानं देशांतर्गत विमान प्रवसासाठीच्या भाड्यावरील मर्यादा रद्द केली आहे. हा निर्णय येत्या ३१ ऑगस्टपासून लागू होणार आहे. (Ministry of Civil Aviation withdraws airfare cap with effect from 31st August)

नागरी उड्डाण मंत्रालयानं बुधवारी काढलेल्या आदेशात म्हटलं की, देशांतर्गत विमान प्रवासाच्या प्रस्तावित फेऱ्यांचा आढावा घेतल्यानंतर तसेच प्रवाशांचा विमान प्रवासाची मागणी लक्षात घेता प्रवास भाड्यावरील नियंत्रण हटवण्यात आलं आहे. ज्याबाबत वेळोवेळी निर्णय घेतला जातो. येत्या ३१ ऑगस्ट २०२२ पासून हा निर्णय लागू होणार आहे. खात्याचे मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी याबाबत ट्विट केलं आहे.

दरम्यान, सर्व विमान कंपन्या आणि विमानतळ नियंत्रकांना कोविडचे नियम काटेकोरपणे पाळावे लागणार आहेत. तसेच कोविडसाठीची योग्य वागणूक कायम ठेवावी लागणार आहे, असंही मंत्रालायनं स्पष्ट केलं आहे. विस्तारा या विमान कंपनीचे सीईओ विनोद कन्नन यांनी १९ जून रोजी म्हटलं होतं की, "जर सरकारनं विमान प्रवासासाठीच्या भाड्याची किमान आणि कमाल मर्यादा वाढवली तर आपल्याला आनंद होईल. पण यावर सर्वात चांगला उपाय म्हणजे विमान कंपन्यांना भाडं ठरवण्याचा पूर्ण अधिकार देण्यात यावा"

कोविड महामारीच्या काळात दोन महिने देशांतर्गत विमान सेवा बंद ठेवल्यानंतर सरकारने ती २५ मे २०२० रोजी पुन्हा सुरु केली होती. यावेळी प्रवासाच्या वेळेनुसार प्रवास भाड्याच्या कमाल आणि किमान रक्कमेवर मर्यादा घातली होती. उदा. सध्या विमान कंपन्या ४० मिनिटांपेक्षा कमी प्रवासासाठी जीएसटी सोडून २,९०० रुपयांपेक्षा कमी आणि ८,८०० रुपयांपेक्षा जास्त प्रवास भाड आकारु शकत नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mill Workers House: मुंबईसह ठाणे, मिरा-भाईंदरमध्येही घरे, गिरणी कामगारांसाठी म्हाडाचं मोठं पाऊल; जागेचा शोध सुरू

'एक अधिकारी, एक कार', सरकारी ताफ्यावर मोदी सरकारचा मोठा निर्णय; गैरवापर आणि खर्च कमी होणार

Latest Live Updates Marathi : राधानगरी भरले ९३ टक्के कोल्हापूर जिल्ह्यातील १७ बंधारे पाण्याखाली

Ambernath: १२व्या मजल्यावरून मांजरीला फेकलं, इसमाचं अमानुष कृत्य CCTVत कैद; अंबरनाथमधील घटनेने हळहळ

Power Bank Damage Signs : पॉवर बँक खराब होण्यापूर्वी देते 'हे' 5 इशारे; दुर्लक्ष करणे ठरू शकते धोकादायक

SCROLL FOR NEXT