Ministry of External Affairs 
देश

परराष्ट्र मंत्रालयाकडून लाओस, कम्बोडियाला जाणाऱ्या भारतीयांसाठी अ‍ॅडव्हायझरी जारी; काय आहे कारण?

Indian nationals travelling to Laos: गेल्या काही दिवसांपासून लाओस आणि कम्बोडियाला जाणाऱ्या भारतीयांची सायबर फसवणूक होत असल्याचं समोर आलं आहे.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने लाओस आणि कम्बोडियामध्ये प्रवास करणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून लाओस आणि कम्बोडियाला जाणाऱ्या भारतीयांची सायबर फसवणूक होत असल्याचं समोर आलं आहे. खोट्या एजेन्ट्सचा सुळसुळाट झाला आहे. या माध्यमातून लोकांची फसवणूक होत आहे. त्यामुळे सरकारला अ‍ॅडव्हायझरी जारी करावी लागली आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने यासंदर्भातील पत्रकात म्हटलंय की, 'सर्व भारतीय नागरिक जे नोकरीसाठी कम्बोडिया किंवा दक्षिण आशियाई देशात जात आहेत. त्यांच्यासाठी महत्त्वाची अ‍ॅडव्हायझरी आहे. खोट्या एजेन्ट्सची संख्या वाढली आहे. भारतामध्ये देखील असे एजेन्ट्स आहेत. ते नोकरीचे आमिष देऊन लोकांना पैसे देण्यासाठी भाग पाडत आहेत. याप्रकरणात सायबर क्राइम वाढला आहे.'

मोठ्या प्रमाणात लोकांची फसवणूक होत आहे. त्यामुळे कम्बोडिया किंवा दक्षिण आशियाई देशात कोणी नोकरीसाठी जात असेल तर त्यांनी खोट्या एजेन्ट्सना बळी पडू नये. त्यांनी परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकृत एजेन्ट्ससोबत संपर्क करून नोकरी संदर्भातील प्रक्रिया पार पाडावी. नोकरी शोधणाऱ्यांनी भारती दुतावासाच्या ई-मेल आयडीवर देखील संपर्क साधू शकतात, असं सरकारकडून सांगण्यात आलंय.

काही लाओसच्या नागरिकांकडून भारतीयांना नोकरीचे आमिष दाखवले जात आहे. डिजिटल सेल्स अँड मार्केटिंग आणि कस्टमर सर्व्हिसेस या पदाच्या नोकरीसाठी भारतीयांना संपर्क केला जात आहे. साधी मुलाखत घेऊन लोकांना भरती केलं जात आहे. त्यांचे लाओसचे तिकीट काढले जात आहे. पण, ते लाओसमध्ये आल्यानंतर त्यांच्याकडून मजूरासारखे काम करुन घेतले जात आहे. त्यांच्याकडून अवैध काम करुन घेतलं जात आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांना काम करावं लागत आहे, असं परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis Satej Patil : मुख्यमंत्री फडणवीस सतेज पाटील यांच्या घरी, दोन्ही भावांना दिला आधार; डी. वाय. पाटील कुटुंबीयांचे सांत्वन

ODI World Cup मधूनच बाहेर होण्याची वेस्ट इंडिजवर पुन्हा टांगती तलवार, थेट एन्ट्री हुकली! काय आहे यामागचं गणित?

Plane Crash Baramati : बारामतीत पुन्हा विमान दुर्घटना; प्रशिक्षण विमान कोसळलं

Marathi News Live Updates : कॉकरोच म्हणणाऱ्यांकडून डिग्री घेणं...; दीक्षांत सोहळ्याला सरन्यायाधीशांना बोलावल्याने विद्यार्थी संतापले

Nalasopara Accident: भारत पेट्रोलियमच्या गॅस वितरण वाहनाने दुचाकीस्वाराला उडवलं, तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT