Salil Parekh_Nirmala Sitharaman Sakal Media
देश

IT portal glitch : अर्थमंत्रालयाकडून इन्फोसिसच्या CEO ना समन्स

इन्कम टॅक्स विभागाच्या पोर्टलमध्ये सातत्यानं येताहेत अडचणी

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : इन्कम टॅक्स विभागाच्या ऑनलाइन पोर्टलमध्ये वारंवार अडचणी येत आहेत. परंतू हे पोर्टल तयार केलेल्या 'इन्फोसिस' ही आयटी कंपनी यातील अडचणी अद्याप सोडवू शकलेलं नाही. त्यामुळे केंद्रीय अर्थमंत्रालयानं इन्फोसिसचे सीईओ आणि एमडी सलिल पारेख यांना समन्स बजावलं आहे.

या समन्समध्ये म्हटलंय की, "इन्कम टॅक्सच्या पोर्टलला लॉन्च होऊन दोन महिने झाले तरी अद्याप यातील अडचणी दूर का झालेल्या नाहीत? याबाबत सलील पारेख यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना स्पष्टीकरण द्यावं."

इन्कम टॅक्सचं नवीन ई-फाईलिंग पोर्टल www.incometax.gov.in मोठा गाजावाजा करत ७ जून रोजी लॉन्च करण्यात आलं होतं. पण आता दोन महिने झाले तरी ते सुरळीतपणे चालत नाही. त्यात अद्यापही अडचणी येत आहेत.

"या पार्श्वभूमीवर इन्फोसिसच्या सीईओ-एमडी सलील पारेख यांना समन्स पाठवण्यात आलं असून २३ ऑगस्ट रोजी याबाबत खुद्द अर्थमंत्र्यांसमोर त्यांना स्पष्टीकरण देण्यास सांगितलं आहे. २१ ऑगस्टपासून तर हे पोर्टल पूर्णपणे ठप्पच आहे." अशा आशयाचं ट्विट स्वतः इन्कम टॅक्स विभागाकडून करण्यात आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe : कामातचं नाही सोशल मीडियावरही तुकाराम मुंढेंचा जलवा; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, विश्वास नांगरे- पाटलांना टाकलं मागे

Nipani Tavandi Ghat Case : राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटाजवळ दगडाने ठेचून गडहिंग्लज साखर कारखान्यातील कर्मचाऱ्याचा खून; महमदवर धारदार शस्रानेही हल्ला

China Nepal Border: मृत्यूचे तांडव डोळ्यांसमोर पाहतोय! प्रत्यक्षदर्शीचा अनुभव; चीन-नेपाळ सीमेवर अडकले राज्यातील ४०० भाविक

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

SCROLL FOR NEXT