Crime News 
देश

Crime News: शौचास गेलेल्या 13 वर्षीय दलित मुलीस शेतात जिवंत जाळले, पोलीस काय म्हणाले?

Crime News: मुलगी सायंकाळच्या सुमारास गावाजवळच्या शेतात शौचास गेली होती.

कार्तिक पुजारी

लखनऊ- शौचास गेलेल्या एका १३ वर्षीय दलित मुलीला जीवंत जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील बलरामपूरमधील हराईया गावातील ही घटना आहे. पोलिसांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. मुलीला कशा पद्धतीने आणि का जाळण्यात आले याचा शोध घेतला जात असल्याचं पोलिसांनी सांगितलं. (Minor Dalit girl)

अतिरिक्त पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी सांगितलं की, मुलगी सायंकाळच्या सुमारास गावाजवळच्या शेतात शौचास गेली होती. एक तासानंतर देखील ती परत न आल्याने कुटुंबियांनी शोध सुरु केला. त्यावेळी काही गावकऱ्यांनी सांगितलं की, जवळच्या शेतामध्ये आग लागली आहे. कुटुंबीय शेतात पोहोचल्यानंतर त्यांना मुलीचा जळलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. हे सर्व पाहून कुटुंबियांना धक्काच बसला.

योगेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीचे जळालेले शरीर पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. तपासानंतरच यावर अधिक भाष्य करता येईल. दरम्यान, सदर घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सदर प्रकरणी तपास करुन दोषींवर कारवाई व्हावी अशी मागणी केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Award List: ऑरेंज-पर्पल कॅप आणि बक्कळ पैसा... पुरस्कार सोहळ्यातही वैभव सूर्यवंशीचाच डंका! पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी

IPL 2026 Final: "जितेश राव, कसं वाटतंय?" हर्षा भोगलेंच्या प्रश्नावर RCB च्या Jitesh Sharma चं मराठीतून उत्तर; म्हणाला...

Virat Kohli Reaction : "आता मॅच जिंकवण्यासाठी मला एकट्यालाच मैदानात उतरावं लागत नाही!" विराट कोहली भावुक

Vaibhav Sooryavanshi : १५ वर्षाच्या पोराने मैदान गाजवले... Orange Cap सह ५ पुरस्कार जिंकल्यानंतर म्हणाला, या पर्वात शिकलो की...

IPL 2026: वैभव सूर्यवंशीला ५ पुरस्कार अन् पैशांचा पाऊस! १५ वर्षांच्या पोराला कारसह BCCI कडून किती रुपयांचे बक्षीस मिळाले?

SCROLL FOR NEXT