Minor Girl Physical Abused esakal
देश

प्रियकरच बनला हैवान! प्रेयसीवर सामूहिक बलात्कार

सकाळ डिजिटल टीम

प्रियकराने शारीरिक संबंधाचे व्हिडिओ बनवून आपल्या मित्रांसोबत शेअर केले. त्यानंतर अल्पवयीन प्रेयसीवर वारंवार सामूहिक बलात्कार केला. कर्नाटकातील येलहंका येथे ही घटना घडली असून याप्रकरणी बंगळुरू पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे, तर अन्य फरार आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.

अल्पवयीन मुलीचे एका २५ वर्षीय तरुणावर प्रेम होते. त्याने आपल्या येलहंका येथील घरी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्याने आपल्या मित्राकडून या शारीरिक संबंधाचा व्हिडिओ बनवला. त्यानंतर या व्हिडिओद्वारे मुलीला ब्लॅकमेल करून वारंवार तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिचा प्रियकर आणि त्याच्या मित्राने त्यांच्या इतर मित्रांना हा व्हिडिओ शेअर केला. त्यांनी व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

अशी उघडकीस आली घटना -

एक दिवस मुलगी रडत घरी परतली. तेव्हा पोलिसांनी ही घटना उघडकीस आल्याचे सांगितले. तिच्या आईने तिला काय झाले याबद्दल विचारणा केली. पण, आई-वडिल रागावतील म्हणून ती खोटं बोलली. तिने मसालेदार कबाब खाल्ल्यामुळे पोट दुखत असल्याचे सांगितले. त्यामुळे रडत असल्याचे तिने आईला सांगितले. पण, ती काही दिवस सतत रडत होती. त्यामुळे आईने तिला विश्वासात घेऊन तिला विचारले. त्यानंतर तिने घडलेली घटना आईला सांगितले. आई-वडिलांनी तत्काळ पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी आतापर्यंत मुख्य आरोपी मुलीच्या प्रियकरासह सात जणांना अटक केली आहे. तसेच अन्य आरोपींचा शोध सुरू आहे. त्यांनी हे व्हिडिओ आणखी कोणाला शेअर केले आहेत का? याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी आरोपींचे मोबाईल जप्त करून सायबर पोलिसांना पाठवले आहेत. येलहंका पोलिसांनी पोक्सोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

आजचे राशिभविष्य - 17 मे 2026

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 16 मे 2026

New Marathi Books Review : वाचनीय आणि संग्रहणीय! अध्यात्मापासून ते पर्यटनाच्या अनुभूतीपर्यंत, नव्या पुस्तकांची रंजक सफर

साप्ताहिक राशिभविष्य : (१७ मे २०२६ ते २३ मे २०२६)

SCROLL FOR NEXT