Supreme Court  esakal
देश

वडिलांचा जीव वाचवण्यासाठी अल्पवयीन मुलाची धडपड; SCकडे मागितली अवयवदानाची परवानगी

मुलाच्या वडिलांचा जीव वाचवण्यासाठी यकृताची गरज आहे.

सकाळ डिजिटल टीम

उत्तर प्रदेश मधील एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने आपल्या आजारी वडीलांनसाठी स्वतांचे यकृत दान करण्यासाठी सुप्रीम कोर्टात मागणीकेली आहे. मुलाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला नोटीस पाठवून उत्तर मागितले आहे. या मुलाच्या वडिलांचा जीव वाचवण्यासाठी यकृताची गरज आहे. ते गंभीर आजारी आहे, मूलगा लहान असल्याने त्याला अवयवदानाचे कायदे अडथळा ठरू शकतात.

या परिस्थितीत वडिलांचा जीव वाचवण्यासाठी मुलाच्या आकांक्षेमुळे राज्य सरकार आणि सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देणार हे पाहावे लागेल. सरन्यायाधीश लळीत यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणावर सुनावणी पार पडत आहे, आता त्यांनी उत्तर प्रदेश सरकारलमधील आरोग्य विभागाल उत्तर देण्याचे सांगितले आहे. यूपीच्या स्थायी वकिलांना आणि लखनऊच्या आरोग्य सचिवांना न्यायालयाच्या आदेशाची माहिती देण्यास सांगण्यात आले आहे.

याचिके नुसार मुलांच्या वडिलांची परिस्थीती गंभीर आहे. त्याना यकृत ट्रांसप्लांटची गरज आहे, यासाठी मुलाने न्यायालयात मागणी केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने युपीच्या आरोग्य विभागाच्या आधिकांऱ्यांना सोमवारी समक्ष हजर राहिला सांगितले आहे. तर अल्पवयीन मुलगा अवयवदान करू शकतो, का हे पाहण्यासाठी न्यायालयाने या प्रकरणाची प्राथमिक तपासणी करण्यास सांगितले आहे. भारतीय कायदा केवळ विषेश परिस्थितीत अल्पवयीन मुलांचे अवयव दान करण्यास परवानगी देतो.

मानवी अवयवांचे प्रत्यारोपण नियम 2014 नुसार, अल्पवयी मुलांना अवयव दान करण्यास परवानगी दिली जात नाही. अपवादात्मक परिस्थितीत, योग्य सक्षम प्राधिकारी आणि संबंधित राज्य सरकार यांच्या पूर्वसुचनेने आणि वास्थवीक परिस्थीती पाहिल्या नंतर परवानगी दिली जाऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नातेवाईक नाहीत, आधार नाही; शेवटच्या प्रवासाची चिंता मिटवण्यासाठी वृद्धाने केलं स्वतःचं श्राद्ध

“मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचं व्हिजन ऐकतो” सिनेमा निवडण्यावर सलमानचा खुलासा

Best Mileage Bikes : कमी पेट्रोलमध्ये जास्त चालतात 'या' 5 दमदार बाईक्स; सर्वाधिक मायलेज अन् किंमत लाखाच्या आतच

वल्लरीचा खोटेपणा उघड होणार? तू हि रे माझा मितवा मधील ट्विस्टने प्रेक्षक चकित

Latest Marathi News Live Update : पुण्यात पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांचा शोध तीव्र

SCROLL FOR NEXT